OpenAI ने रोलआऊट केलं नवं फीचर, आता ChatGPT मध्ये मिळणार हिस्ट्रीमधून सर्च करण्याचं ऑप्शन
OpenAI च्या ChatGPT चॅटबॉटने जगाला वेड लावले आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये OpenAI च्या टेक्स्ट-जनरेटिंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ChatGPT लाँच करण्यात आलं आहे. लाँच झाल्यापासून लोकांमध्ये ChatGPT ची क्रेझ अजूनही कायम आहे. ChatGPT च्या मदतीने युजर्स त्यांच्या प्रश्नांना प्रतिसाद मिळवू शकतात. या वर्षाच्या सुरुवातीला, OpenAI ने ChatGPT साठी ‘मेमरी’ नावाचे एक नवीन फीचर रोलआऊट केलं.
हेदेखील वाचा- OpenAI ने ChatGPT मध्ये आणलं Canvas इंटरफेस, आता सोपं होणार ‘हे’ काम
मेमरी फीचर तुमची ChatGPT ची हिस्ट्री लक्षात ठेवतं. म्हणजे तुम्ही यापूर्वी ChatGPT सोबत कोणत्या विषयांवर संवाद साधला आहे. कोणत्या विषयांबाबत चर्चा केली आहे, या सर्व गोष्टी मेमरी फीचरमध्ये सेव्ह केल्या जातात. मेमरी फीचरनंतर आता OpenAI ने ChatGPT चॅटबॉटसाठी चॅट हिस्ट्री सर्च फीचर रोलआऊट केलं आहे. याबाबत OpenAI ने पोस्ट शेअर करत महिती दिली आहे. या चॅट हिस्ट्री सर्च फीचरमध्ये तुम्ही मेमरीमध्ये सेव्ह केलेली हिस्ट्री पाहू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
तसेच तुम्हाला यामध्ये तुमच्या हिस्ट्रीमधून सर्च करण्याचा ऑप्शन देखील दिला जाणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे जुने चॅट्स पटकन आणि सहजपणे शोधू शकता. तसेच समजा तुम्ही ChatGPT सोबत शॉपिंगबाबत गप्पा मारत आहात. आणि तुमचं संभाषण अर्धवट राहिलं, तर तुम्ही चॅट हिस्ट्री सर्च फीचरच्या मदतीने ते संभाषण कंटिन्यू करू शकता.
चॅट हिस्ट्री सर्च फीचर हे ChatGPT साठी ‘मेमरी’ मधील एक वेगळे वैशिष्ट्य आहे, कारण ते वापरकर्त्यांना काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी जुने चॅट सर्च करण्याचं ऑप्शन देते. शिवाय, OpenAI ने पुष्टी केली आहे की हे नवीन फीचर सध्या टप्प्याटप्प्याने सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. ChatGPT Plus आणि Teams सदस्यांना ऑक्टोबर 2024 च्या अखेरीस हे फीचर उपलब्ध असेल. तर Enterprise आणि Edu सदस्यांना पुढील महिन्याच्या सुरुवातीला हे फीचर उपलब्ध करून दिलं जाणार आहे. विनामूल्य वापरकर्त्यांना नोव्हेंबर 2024 च्या अखेरीस चॅट हिस्ट्री सर्च फीचर उपलब्ध होणार आहे.
हेदेखील वाचा- ChatGPT चा वापर करून तुम्ही कमवू शकता लाखो रुपये! कसं? जाणून घ्या
OpenAI ने मंगळवारी त्याच्या AI चॅटबॉट ChatGPT साठी एक नवीन वैशिष्ट्य जाहीर केले. हे नवीन फीचर युजर्सना त्यांच्या चॅट इतिहासातून सर्च करण्याची परवानगी देणार आहे. सध्याच्या वर्कअराउंडमधील ही एक महत्त्वपूर्ण सुधारणा आहे ज्यासाठी वापरकर्त्यांना इच्छित संभाषण शोधण्यासाठी संपूर्ण इतिहास स्क्रोल करणे आवश्यक आहे. सध्या, हे वैशिष्ट्य फक्त चॅट हिस्ट्री सर्च फीचरच्या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे आणि ते प्लॅटफॉर्मच्या सशुल्क सदस्यांसाठी आणले जात आहे.
एका पोस्टमध्ये OpenAI च्या अधिकृत हँडलने नवीन वैशिष्ट्याची घोषणा केली. चॅट हिस्ट्री सर्च फीचरसाठी चॅट हिस्ट्री सर्च फीचरसाठी ChatGPT युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करत होते. आता अखेर त्यांची ही मागणी पूर्ण झाली असून नवीन फीचर रोलआऊट करण्यात आलं आहे. हे वैशिष्ट्य सध्या ChatGPT Plus आणि टीम वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. OpenAI ने हे देखील हायलाइट केले आहे की एंटरप्राइझ आणि Edu सदस्यांना एका आठवड्यात चॅट हिस्ट्री सर्च फीचरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.