फोटो सौजन्य - POCO
लोकप्रिय टेक कंपनी Poco आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Poco M6 Plus 5G लाँच करणार आहे. आज 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता Poco M6 Plus 5G भारतात लाँच केला जाणार आहे. याशिवाय Poco Buds X1 देखील आज लाँच होणार आहे. त्यामुळे अगदी काही वेळातच ग्राहकांना Poco Buds X1 आणि Poco M6 Plus 5G ची खरेदी करता येणार आहे. Poco M6 Pro च्या जबरदस्त यशानंतर कंपनीने Poco M6 Plus 5G लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत X अकाऊंटवर आज 1 ऑगस्ट रोजी Poco M6 Plus चे लाइव्ह लाँचिंग पाहू शकता.
हेदेखील वाचा- Airtel युजर्ससाठी खुशखबर! आता रिचार्ज संपला तरी नो टेंशन; कंपनी देणार फ्री इंटरनेट
Poco M6 Plus 5G आकर्षक, स्टाइलिंग, प्रो-ग्रेड फोटोग्राफी आणि पॉवर यांचं उत्तम कॉम्बिनेशन असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Poco M6 Plus 5G तुम्हाला बजेट किंमतीत उपलब्ध होणार आहे. Poco M6 Plus 5G फोन तुम्हाला प्रिमियम वाइब्स देतो. फोनचे डिझाईन अतिशय आकर्षक आहे. फोनला एक प्रिमियम लूक देण्यात आला आहे. तुम्ही Poco M6 Plus 5G मिस्टी लॅव्हेंडर, आइस सिल्व्हर किंवा क्लासिक ग्रेफाइट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. चला तर मग या फोनच्या फीचर्सवर नजर टाकूया.
हेदेखील वाचा-
Poco M6 Plus 5G चे डिझाईन अतिशय प्रिमियम आहे. या फोनच्या सेगमेंटला स्टायलिश रिंग फ्लॅश डिझाइन आहे.
कंपनी Poco M6 Plus 5G फोनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले ऑफर करत आहे. फोनमध्ये 120Hz ॲडॉप्टिव्ह सिंकसह एक जबरदस्त 6.79-इंच FHD+ डिस्प्ले आहे. जो 3D लूक देतो. 8.32 मिमी प्रोफाइलसह, डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण आहे. फोनला पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP53 रेटिंग आहे. डिव्हाइस एक फिंगरप्रिंट सेन्सरसह येते.
Poco M6 Plus 5G मध्ये 108MP ड्युअल रियर कॅमेरा सिस्टम आहे. स्मार्टफोनवरील 9-इन-1 पिक्सेल बिनिंग तंत्रज्ञान इमेजची गुणवत्ता आणखी वाढवेल. फोनमध्ये सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Poco M6 Plus 5G मुळे तुम्ही अंधारात देखील चांगले फोटो काढू शकता.
Poco M6 Plus 5G फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 AE प्रोसेसरवर आधारित आहे. Poco M6 Plus सर्वोत्तम 5G अनुभव प्रदान करते. मल्टीटास्किंग अनुभवासाठी 8GB वर्च्युअल रॅमसह सुमारे 460K आणि 16GB पर्यंत RAM देण्यात आला आहे. यामध्ये N2B बेंचमार्क स्कोअर आहे. Poco M6 Plus 5G Xiaomi HyperOS वर चालतो. या नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअरसह लाँच होणारा आणि Android 14 वर आधारित असणारा Poco M मालिकेतील हा पहिला स्मार्टफोन बनला आहे.