फोटो सौजन्य: iStock
जर तुम्ही सुद्धा यंदाच्या सणासुदीच्या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग Flipkart Big Billion Days मध्ये तुम्हाला पोकॉच्या स्मार्टफोन्सवर दमदार डिस्काउंट मिळत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पोको इंडिया या देशातील झपाट्याने विकसित होत असलेल्या टेक्नॉलॉजी ब्रँडने आज फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल 2025 चा भाग म्हणून त्यांच्या लोकप्रिय स्मार्टफोनसाठी बहुप्रतिक्षित उत्सवी किंमती जाहीर केल्या. ‘पोको फेस्टिव्ह मॅडनेस’ मोहिमेअंतर्गत ब्रँड अप्रतिम किंमतींसह नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान देण्यास सज्ज असून, यामुळे यंदाचा सणासुदीचा काळ भारतातील तंत्रज्ञानप्रेमींसाठी अधिक खास ठरणार आहे.
२२ सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट प्लस व ब्लॅक सदस्यांना सेलचा लवकर लाभ मिळेल, तर २३ सप्टेंबरपासून हा सर्व ग्राहकांसाठी खुला होईल. आकर्षक सवलतींबरोबरच HDFC, अॅक्सिस आणि ICICI क्रेडिट/डेबिट कार्डवर २,००० रुपयांपर्यंतच्या कॅशबॅक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट EMI सुविधाही उपलब्ध असतील.
पोको M7 5G : 12GB (6GB टर्बो RAMसह) रॅम, स्नॅपड्रॅगन® 4 जेन 2 चिपसेट, 50MP सोनी कॅमेरा आणि 6.88-इंच HD+ डिस्प्ले असलेला हा श्रेणीतील सर्वात गतीशील 5G स्मार्टफोन.
पोको M7 Plus 5G : 7000mAh बॅटरी, 18W रिव्हर्स चार्जिंग, 6.9-इंच FHD+ डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट असलेला पॉवरहाऊस. आता नवीन 4GB रॅम व्हेरिएंटमध्ये उपलब्ध.
पोको X7 Pro 5G : 1.7 दशलक्षहून अधिक Antutu स्कोअर, मीडियाटेक Dimensity 8400 Ultra चिपसेट, 6550mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी आणि 90W फास्ट चार्जरसह सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन.
पोको F7 5G : 7550mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी, Snapdragon® 8s Gen 4 प्रोसेसर आणि 2.1 दशलक्षहून अधिक Antutu स्कोअरमुळे हा फ्लॅगशिप-लेव्हल कार्यक्षमतेचा अनुभव देणारा स्मार्टफोन, जो पॉवर यूजर्ससाठी परिपूर्ण आहे.
अद्वितीय कार्यक्षमता, आधुनिक नाविन्य आणि उत्सवी किंमतींसह पोकोने भारतीय तरुण ग्राहकांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला आहे. या घोषणेमुळे बिग बिलियन डेज 2025 ग्राहकांसाठी संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.