Tech Tips: Amazon-Flipkart सेलमध्ये तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वर लवकरच फेस्टिव्ह सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना मोठ्या डिस्काऊंट आणि ऑफर्ससह अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच अगदी घरगुती वस्तूंपासून गॅझेट्सपर्यंत ग्राहक अनेक वस्तू कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या आगामी सेलची घोषणा केली आहे. ग्राहक या सेलसाठी प्रचंड उत्सुक आहेत. कारण ग्राहकांना त्यांच्या बजेट किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
सेलमध्ये ग्राहकांना त्यांचे ड्रिम स्मार्टफोन देखील बजेट किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये बँक ऑफर्स आणि फ्लॅट डिस्काऊंटमुळे स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी होतात. याशिवाय ई कॉमर्स कंपन्या नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज डील्स देखील ऑफर करत असतात. ज्यामुळे ग्राहकांना नवीन स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. एक्सचेंज डील्समुळे स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी होतात. हीच ऑफर ग्राहकांसाठी फायद्याची ठरते. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रिमियम आणि महागडा स्मार्टफोन खरेदी करताना सहसा ग्राहक एक्सचेंज डील्सला प्राधान्य देतात. यामुळे नवीन स्मार्टफोन कमी किंंमतीत खरेदी करता येतो, तसेच जुन्या स्मार्टफोनचे चांगले पैसे देखील मिळतात. तुम्ही देखील आगामी सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा आणि एक्सचेंज डील्सचा लाभ घेण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
तुमच्या जुन्या फोनची फिजिकल कंडीशन आणि त्याचे मॉडल एक्सचेंज वॅल्यू ठरवते. जर तुमच्या फोनची स्क्रीन तुटली असेल किंवा फोनची बॉडी डॅमेज झाली असली तर एक्सचेंज वॅल्यू कमी होते. पण जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला जास्त किंमत मिळू शकते.
जर तुमच्याकडे तुमच्या जुन्या फोनचे बिल, बॉक्स आणि चार्जर असेल, तर यामुळे तुमच्या फोनची किंमत वाढते. जर तुम्ही फोन एक्सचेंज करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी तुमच्याकडे असल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी त्या स्मार्टफोनमधील महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घ्या. यानंतर मोबाइलला फॅक्ट्री रिसेट करा. यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येणार नाही. तुमच्या फोनच्या डेटाचा बॅकअप घेण्यासाठी तुम्ही लॅपटॉप देखील वापरू शकता.
कधीही एकाच ठिकाणी एक्सचेंज वॅल्यू पाहून निर्णय घेऊ नका. वेगवेगळ्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुमच्या मोबाईलची एक्सचेंज वॅल्यू तपासा. ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त एक्सचेंज वॅल्यू मिळत असेल ती डिल ठरवा.
फोनच्या एक्सचेंज व्हॅल्यूसोबतच, जर तुम्ही त्यात बँक ऑफर्स किंवा विशेष सवलती देखील जोडल्या तर हा करार आणखी फायदेशीर होऊ शकतो.
Amazon-Flipkart सेल कधी सुरु होणार आहे?
23 सप्टेंबर
Flipkart Pre-Reserve Pass काय आहे?
Flipkart Pre-Reserve Pass म्हणजेच सेलमध्ये आयफोन खरेदी करण्यापूर्वी तो एडवांस बुकिंग करून ठेवणं
सेलमध्ये कोणत्या वस्तूंवर ऑफर असणार आहे?
घरगुती वस्तू, नवीन गॅझेट्स, फॅशन आणि ब्यूटी प्रोडक्ट्स