TRAI देतोय तीन महिने मोफत रिचार्ज? 200GB डेटासह अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध! काय आहे सत्य, वाचा
सोशल मिडीयावर अनेक मॅसेज सतत व्हायरल होत असतात, ज्यामधील काही मॅसेज खरे असतात तर काही खोटे. सायबर फ्रॉडर्स आणि हॅकर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी खोटे मॅसेज सोशल मिडीयावर शेअर करतात. अशा काही मॅसेजना सामान्य नागरिक बळी पडतात आणि त्यांचं मोठं नुकसान होतं. सध्या सोशल मीडियावर TRAI (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) च्या नावाने एक मॅसेज व्हायरल हात आहे. या मॅसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, TRAI मोबाईल युजर्सना 200GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह तीन महिन्यांचा रिचार्ज मोफत देत आहे. या मॅसेजमधील सत्य आता आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- New Telecom Rules: Jio, Airtel आणि Vi युजर्स लक्ष द्या! TRAI ने वाढवली OTP ची डेडलाइन, या दिवशी लागू होणार नवे नियम
सोशल मिडीयावर TRAI च्या नावाने व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये एक लिंक शेअर करण्यात आली आहे. या व्हायरल मॅसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सर्व भारतीय नागरिकांना मोफत मोबाइल रिचार्ज देत आहे. मात्र हा दावा खोटा असून TRAI नागरिकांना कोणत्याही प्रकारचे मोफत रिचार्ज देत नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पीआयबीने स्पष्ट केले आहे की असे कोणतेही फ्री रिचार्ज जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे हा दावा पूर्णपणे खोटा आहे.
याबाबत पीआयबीने सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. पीआयबीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे, यामुळे लोकांची दिशाभूल केली जात आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने सांगितले की, ही लिंक फसवणुकीचा एक भाग आहे आणि त्यावर क्लिक केल्यास तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याचा धोका आहे. अशा कोणत्याही मोफत रिचार्जबाबत ट्रायकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे पीआयबीने म्हटले आहे.
अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी हा संदेश फॉरवर्ड करू नये आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असं आवाहन TRAI मार्फत करण्यात आलं आहे. असे मॅसेज यापूर्वीही अनेकदा आले आहेत. याबाबत सायबर तज्ज्ञांनी काही टीप्स शेअर केल्या आहेत. या टीप्स फॉलो करणं मोबाईल युजर्ससाठी आवश्यक आहे.
हेदेखील वाचा- TRAI ने करोडो मोबाईल वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा, आता ‘या’ दिवसापासून लागू होणार नवीन नियम
फ्री मॅसेजचा दावा करून सायबर गुन्हेगार घोटाळे करतात आणि वैयक्तिक डेटा चोरतात आणि बँक खात्यातून पैसे काढतात. अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे युजर्सनी कोणत्याही अज्ञात आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळा. अशा लिंकमुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
सायबर तज्ञांचे म्हणणे आहे की, अज्ञात स्त्रोताकडून मिळालेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. जर कोणी संदेशाद्वारे लाभ देण्याचा दावा करत असेल तर त्याची सत्यता तपासा. सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहा आणि अशा संशयास्पद लिंक्स तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू नका.