Redmi Note 14 Pro 4G स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, MediaTek चिपसेटसह करणार एंट्री
टेक कंपनी Xiaomi ने काही महिन्यांपूर्वीच आपल्या होम मार्केट चीनमध्ये Redmi Note 14 सीरीज लाँच केली होती. आता ही सिरीज जागतिक स्तरावर लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. Xiaomi कंपनी प्रथम Redmi Note 14 Pro 4G स्मार्टफोन लाँच करेल. या Redmi फोनचे कोडनेम Obsidian आहे जो MediaTek चिपसेट सह बाजारात लाँच केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हेदेखील वाचा- Google Maps : हे आहेत गुगल मॅपव्यतिरिक्त बेस्ट नेविगेशन अॅप्स, नक्की ट्राय करा
आजकाल, Xiaomi त्याच्या Redmi Note 14 सिरीजचा एक नवीन 4G प्रकार लाँच करण्याच्या तयारीत आहे. Xiaomi ने गेल्या महिन्यात चीनच्या होम मार्केटमध्ये ही सीरिज लाँच केली होती. या सीरीज अंतर्गत, कंपनीने Redmi Note 14 5G, Note 14 Pro 5G आणि Note 14 Pro Plus 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता कंपनी या सीरिजच्या 4G मॉडेल, Redmi Note 14 Pro 4G सह जागतिक लाँचची तयारी करत आहे. (फोटो सौजन्य – X)
Redmi Note 14 Pro 4G स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी IMEI डेटाबेस सूचीवर दिसला आहे. या सूचीमध्ये, Xiaomi चा आगामी Redmi Note 14 Pro 4G स्मार्टफोन मॉडेल क्रमांक 24116RACCG सह स्पॉट झाला आहे. IMEI डेटाबेसमध्ये आगामी फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या Xiaomi फोनचे कोडनेम Obsidian आहे, जे MediaTek चिपसेट सह ऑफर केले जाईल. मात्र, या फोनमध्ये कोणता MediaTek चिपसेट दिला जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. Xiaomi ने या फोनच्या 5G प्रकारात MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर दिला आहे.
हेदेखील वाचा- Apple बॅटरी रिप्लेसमेंट प्रोसेस करणार अधिक सोपी, iPhone 17 लाइनअपमध्ये मिळणार एक खास सिस्टम
Xiaomi सामान्यत: नोट सीरीजचे 4G स्मार्टफोन सर्वप्रथम जागतिक बाजारात लाँच करते. याआधीही कंपनीने चीनमध्ये Snapdragon 7s Gen 2 चिपसेटसह Redmi Note 13 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला होता. Redmi ने MediaTek Helio G99 अल्ट्रा चिपसह Note 13 Pro 4G स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला. चिपसेट वगळता Redmi Note 14 Pro 5G आणि 4G या दोन्ही आवृत्त्यांची वैशिष्ट्ये सारखीच असण्याची शक्यता आहे.
Note 14 सिरीज जागतिक बाजारपेठेत चीनपेक्षा वेगळी असेल. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की Redmi Note 14 लाइनअपचा बेस वेरिएंट स्नॅपड्रॅगन चिप सह ऑफर केला जाऊ शकतो. हे चीनमध्ये MediaTek च्या Dimensity 7025 चिपसेटसह सादर केले गेले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G सपोर्ट असेल. सध्या क्वालकॉमकडून कोणता चिपसेट असेल याबाबत माहिती उपलब्ध नाही.
IMEI डेटाबेसमध्ये Redmi Note 14 सीरीजचे अनेक मॉडेल्स स्पॉट झाले आहेत. 24117RN76L, 24117RN76O, 24117RN76G, आणि 24117RN76E हे Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi च्या या आगामी फोनचे मॉडेल क्रमांक आहेत.