Apple बॅटरी रिप्लेसमेंट प्रोसेस करणार अधिक सोपी, iPhone 17 लाइनअपमध्ये मिळणार एक खास सिस्टम
टेक जायंट कंपनी ॲपल लवकरच त्यांचा नवीन ॲपल आयफोन 17 लाइनअप लाँच करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र फोनबाबत काही डिटेल्स लिक झाले आहेत. अहवालानुसार, कंपनी ॲपल आयफोन 17 लाइनअपसाठी बॅटरी बदलणे अधिक सोपं करणार आहे. आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस सारख्या बॅक पॅनलला जोडण्यासाठी कंपनी नवीन ॲडहेसिव्ह वापरेल. यामध्ये, बॅक पॅनल उघडण्यासाठी लो-वोल्टेज इलेक्ट्रिक करंट आवश्यक आहे. याच्या मदतीने युजर्स सहजपणे बॅटरी बदलू शकतील. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
हेदेखील वाचा- आता गाणी ऐकण्याचा आनंद होईल दुप्पट! Spotify चे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन केवळ 15 रुपयांमध्ये
ॲपलने iPhone 17 सीरीज लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. ॲपलच्या आगामी आयफोनबाबत अनेक अहवाल समोर येत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवला तर, कंपनी आगामी आयफोन मॉडेल्सच्या डिझाइनमध्ये बदल करू शकते, ज्यामुळे या आयफोनची बॅटरी बदलणे सोपे होईल. कंपनीने आयफोन16 Pro मॉडेलमध्ये स्ट्रेच-रिलीज ॲडेसिव्ह पुल टॅब वापरला आहे. त्याच वेळी, आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसच्या बॅक पॅनलला जोडण्यासाठी नॉव्हेल ॲडहेसिव्हचा वापर करण्यात आला आहे. हे 9V बॅटरी किंवा USB-C चार्जरसह लो-वोल्टेज इलेक्ट्रिक करंटने सहजपणे काढले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – X)
अहवालांवर विश्वास ठेवला तर, ॲपल आता त्याच्या आगामी आयफोन17 लाइनअपच्या सर्व मॉडेल्समध्ये नवीन इलेक्ट्रिक बॅटरी रिमूवल मेथड सादर करू शकते. कंपनी पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आयफोन 17 सीरीज अंतर्गत आयफोन 17, आयफोन 17 Pro, आयफोन 17 Pro Max आणि नवीन आयफोन 17 Air लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कंपनीकडून अद्याप याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. Apple त्याच्या आगामी डिव्हाईसची टिकाऊपणा आणि दुरुस्तीची क्षमता सुधारत आहे.
हेदेखील वाचा- फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर, सॅमसंगचा 60 हजार रुपयांचा प्रीमियम स्मार्टफोन अर्ध्या किमतीत उपलब्ध
युरोपियन युनियन (EU) ने जून 2023 मध्ये एक कायदा पास केला आहे, ज्यानुसार कंपन्यांना सर्व ग्राहक डिव्हाईस अशा प्रकारे डिझाइन करावी लागतील की त्यांची दुरुस्ती करणे सोपे होईल. यासह, युजर्स बॅटरी असलेल्या डिव्हाइसची बॅटरी सहजपणे बदलू शकतात. EU ने सांगितलं आहे की, कंपन्यांनी अशा प्रकारची साधन वापरू नयेत ज्यासाठी युजर्सना टूल्सची आवश्यकता लागेल. हा EU नियम 2027 पासून लागू केला जाणार आहे. अशा स्थितीत कंपन्यांकडे सध्या तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आता ॲपलने आपल्या आगामी आयफोनच्या डिझाइनमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे.
साधारणपणे, स्मार्टफोन आणि इतर बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा बॅटरी बॅकअप काही काळानंतर कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत, बॅटरी बदलणे आवश्यक आहे. आजकालच्या स्मार्टफोन्समध्ये बॅटरी बदलणे खूप क्लिष्ट आणि महाग आहे.बॅकपॅनल काढणे सोपे असल्यास, युजर्स स्वतः बॅटरी बदलू शकतील. यामुळे, वापरकर्त्यांना बॅटरी बदलण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. यासोबतच बॅटरी बदलून युजर्स त्यांचा फोन आणखी काही वर्षे वापरू शकतील, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणासही मदत होईल.