फोटो सौजन्य - सोशल मिडीया
काही दिवसांपूर्वी JIO, Airtel आणि Vodafone-idea ने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. कंपन्याच्या या निर्णयामुळे युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. पण नाराज झालेल्या युजर्सासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक अतिशय स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन तुमच्या बजेटमध्ये बसणारा आहे. या प्लॅनची किंमत केवळ ९५ रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
Vi ने त्यांच्या युजर्ससाठी अतिशय स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. Vi ने त्यांच्या यूजर्ससाठी ९५ रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. आज कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटरचा सर्वात स्वस्त प्लॅन १०० रुपयांपेक्षा कमी नाही. अशातच Vi ने त्यांच्या यूजर्ससाठी ९५ रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. ह्या प्लॅनमुळे युजर्सना रिचार्ज करण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे. ९५ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना 4 GB डेटा मिळेल. तसेच लोकप्रिय OTT अॅप SonyLIV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
९५ रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनचा कालावधी २८ दिवसांचा असेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळणार नाही, यासाठी त्यांना वेगळे रिचार्ज करावे लागेल. SonyLIV चे मासिक सबस्क्रिप्शन 399 रुपयांना येतं. 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 डिव्हाइसवर लॉग इन करू शकतात. पण Vi च्या या नव्या प्लॅनमधअये फक्त 95 रुपयांमध्ये SonyLIV चे 28 दिवसांचे सबस्क्रिप्शन मिळत आहे.
Vodafone-idea डेटा प्लॅन्सच्या किंमतीत वाढ
JIO – Airtel नंतर टेलिकॉम कंपनी Vodafone-idea ने देखील डेटा प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Vodafone-idea ने च्या या निर्णयामुळे त्यांच्या युजर्सना मोठा झटका बसला. Vodafone-idea ने त्यांच्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये ११ ते २३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ३ जुलैपासून Vodafone-idea चे नवे दर लागू होणार आहेत. Vodafone-idea ने अॅड ऑन डेटा प्लॅनमध्ये देखील वाढ केली आहे. १९ रुपयांपासून सुरू झालेला प्लॅन आता युजर्सना २२ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये युजर्सना एका दिवसासाठी १ GB डेटा मिळतो. ३९ रुपयांच्या प्लॅनसाठी आता युजर्सना ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी ३ दिवसांची असून यामध्ये युजर्सना ६ GB डेटा मिळतो.