स्मार्टफोमसाठी थर्ड पार्टी ॲप्स ठरतात धोकादायक! ॲप्स डाउनलोड करताना या गोष्टी लक्षात ठेवा
सध्याच्या डिजीटल आणि स्मार्टफोनच्या जगात थर्ड पार्टी ॲप्सचा वापर अगदी सामान्य झाला आहे. आपण आपल्या प्रत्येक कामासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे ॲप्स डाऊनलोड करतो. आपण जेव्हा नवीन स्मार्टफोन खरेदी करतो, तेव्हा आपल्या स्मार्टफोनमध्ये काही ॲप्स ईनबिल्ड असतात. पण आपल्या रोजच्या कामांसाठी हे ॲप्स पुरेसे नसतात. त्यामुळे आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक थर्ड पार्टी ॲप्स डाऊनलोड करतो. असाईंमेंट, व्हिडीओ एडीटींग, फोटो एडीटींग, पीडीएफ मेकिंग अशा अनेक कामांसाठी आपण थर्ड पार्टी ॲप्सवर अवलंबून असतो. मात्र, या ॲप्सच्या वाढत्या वापरामुळे सुरक्षेचा धोका वाढतो.
हेदेखील वाचा- स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल, 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन आणि 11 लाख व्हॉट्सॲप अकाउंट्सवरही बंदी
थर्ड पार्टी ॲप्समुळे केवळ आपली वैयक्तिक माहिती धोक्यात येत नाही तर आपल्या बँक अकाऊंटला देखील धोका निर्माण होऊ शकतो. थर्ड पार्टी ॲप्समुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. आपण आपल्या कामासाठी प्ले स्टोअरवरून कोणतेही थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करतो. असे केल्यास ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला काही सेफ्टी टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे बँक खाते आणि वैयक्तिक डेटा सुरक्षित करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
आपल्या मनात येणारा सामान्य प्रश्न म्हणजे थर्ड पार्टी ॲप सुरक्षित का नाहीत? आपण हे ॲप इतर ॲपप्रमाणे डाऊनलोड करतो आणि त्यांना वापरतो. पण थर्ड-पार्टी ॲप्स अनेकदा संवेदनशील माहितीचा ॲक्सेस असलेले डेवलपर्स तयार करते. ज्यामुळे आपली माहिती अगदी सहज हॅकर्सपर्यंत पोहोचते आणि आपलं नुकसान होऊ शकतं.
बनावट ॲप्स – थर्ड-पार्टी ॲप्स स्टोअरमध्ये वॅलीड ॲप्स किंवा प्रसिद्ध ॲप्सच्या बनावट प्रती असू शकतात. हे ॲप्स कधीकधी वापरकर्त्यांची फसवणूक करण्यासाठी तयार केले जातात जेणेकरून त्यांचे डिव्हाइस नंतर मालवेअरने हॅक केले जाऊ शकतात.
हेदेखील वाचा- WhatsApp Story Update: व्हॉट्सॲपवर आलं नवीन अपडेट, इंस्टाग्राम स्टोरीप्रमाणे व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर
कालबाह्य सॉफ्टवेअर – डेवलपर्सद्वारे तयार केलेले थर्ड-पार्टी ॲप्स काही क्षणी सोडून दिले जाऊ शकतात आणि यापुढे सॉफ्टवेअर अपडेट प्राप्त करणार नाहीत. यामुळे अशा ॲप्समधील सुरक्षेचा धोका वाढतो.
फसवणूक– थर्ड-पार्टी ॲप्स विशेषत: फसवणूक करण्यासाठी डिझाइन केलेले असू शकतात. जर एखाद्या वापरकर्त्याने हे ॲप डाउनलोड केले तर त्याची वैयक्तिक माहिती आणि बँक खाते सहजपणे हॅक होऊ शकते.