फ्लिपकार्ट प्लस आणि अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी सेल झाला सुरु! घरगुती वस्तूंपासून टेक गॅझेट्सपर्यंत सर्व वस्तूंवर दमदार डिस्काऊंट
फ्लिपकार्ट प्लस आणि अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी Flipkart Big Billion Days 2024 आणि Amazon Great Indian Festival सेल सुरु झाला आहे. 26 सप्टेंबर रात्री 12 वाजल्यापासून हा सेल सुरु झाला आहे. तर इतर ग्राहकांसाठी हा सेल 27 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तुम्ही या सेलमधून घरगुती वस्तूंपासून टेक गॅझेट्सपर्यंत सर्व वस्तू डिस्काऊंट ऑफर्समध्ये खरेदी करू शकता. स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ब्रँडेड कपडे, घड्याळ, शूज, सर्व वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी म्हणजे Flipkart Big Billion Days 2024 आणि Amazon Great Indian Festival सेल.
हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Festival Sale: फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स
Flipkart Big Billion Days 2024 आणि Amazon Great Indian Festival सेलमध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तूवर जबरदस्त डिस्काऊंट आणि बंपर ऑफर्स मिळणार आहेत. तुम्ही नवरात्रीसाठी शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर Flipkart Big Billion Days 2024 आणि Amazon Great Indian Festival सेल तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. (फोटो सौजन्य – Flipkart व Amazon)
भारतातील सर्वाधिक विक्री होणारा 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A14 5G फ्लिपकार्टच्या आगामी बिग बिलियन डेज सेलदरम्यान अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सेलमध्ये तुम्हाला iPhone वर चांगली डील मिळणार आहे.तुम्ही Google Pixel सिरीजची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलपेक्षा चांगली संधी असू शकत नाही. Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सेलमध्ये तुम्ही केवळ 70,000 रुपयांच्या किंमतीत Samsung Galaxy S-23 Ultra ची खरेदी करू शकता. सेलमध्ये तुम्ही 1.40 लाख रुपयांना Vivo X Fold 3 Pro खरेदी करू शकता.
हेदेखील वाचा- OpenAI चं एक्स अकाऊंट झालं हॅक! पोस्ट करत स्कॅमला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
Flipkart Big Billion Days 2024 आणि Amazon Great Indian Festival सेलमधून तुम्ही अत्यंत कमी किंमतीत तुमच्या आवडत्या ब्रँडच्या लॅपटॉपची खरेदी करू शकणार आहात. ASUS Vivobook 15 ची किंमत 69,990 रुपये आहे, परंतु ऑफरनंतर हा लॅपटॉप 36,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Chromebook Plus ची किंमत 49,990 रुपये आहे. परंतु सेलमध्ये हा लॅपटॉप 21,490 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. Acer Swift Go 14 ची किंमत 93,999 रुपये आहे, परंतु तुम्ही सेलमध्ये हा लॅपटॉप 49,990 रुपयांना खरेदी करू शकता. HP Pavilion ची किंमत 78,189 रुपये असली तरी सेलमध्ये त्याची किंमत 49,990 रुपये आहे.
Flipkart Big Billion Days 2024 आणि Amazon Great Indian Festival सेलमध्ये तुम्ही डिस्काऊंट ऑफर्ससह तुमच्या आवडत्या कॅमेऱ्याची खरेदी करू शकता. Canon R100 मिररलेस कॅमेरा 35,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. तर SONY Alpha ILCE-6600 APS-C मिररलेस कॅमेरा 57,990 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. या सेलमधून तुम्ही NIKON Z 50 मिररलेस कॅमेरा 78,990 रुपयांना खरेदी करू शकता.