
Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 वर मिळत आहे जबरदस्त ऑफर्स, बचत करण्याची संधी गमावू नका
सणाच्या ऑफर्समध्ये Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सॅमसंग इंडियाने दोन्ही फोनवर ऑफर जाहीर केल्या आहेत. स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 12500 रुपयांपर्यंत कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआय आणि इतर ऑफर मिळणार आहेत. Galaxy Watch Ultra आणि Galaxy Buds 3 वर देखील सूट असेल. फोल्ड आणि फ्लिप फोन AI वैशिष्ट्यांसह येतात.
हेदेखील वाचा- Infinix Zero Flip या दिवशी होणार लाँच! सॅमसंग आणि शाओमीच्या फ्लिप फोन्ससोबत करणार स्पर्धा
सॅमसंग इंडियाने Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 foldable वर सणाच्या ऑफर जाहीर केल्या आहेत. ऑफर अंतर्गत, ग्राहकांना कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआय आणि इतर अनेक ऑफर मिळू शकतात. युजरचा अनुभव सुधारण्यासाठी जुलैमध्ये लाँच झालेल्या या फोन्समध्ये अनेक नवीन Galaxy AI फीचर्स देण्यात आले आहेत. हे फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Galaxy Z Fold 5/Z Flip 5 चे अपग्रेड आहेत. (फोटो सौजन्य – X)
सणासुदीच्या ऑफरमध्ये Samsung Galaxy Z Fold 6 खरेदी केल्यावर तुम्हाला अपग्रेड बोनस किंवा 12,500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय स्मार्टफोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन 4,584 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करू शकता.
Galaxy Z Flip 6 बद्दल बोलायचे झाले तर, यात अपग्रेड बोनस किंवा 11,000 रुपयांचा बँक कॅशबॅक मिळत आहे, यासोबत तुम्ही 3,056 रुपयांच्या किमतीवर 24 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI चा लाभ देखील घेऊ शकता. Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फक्त 999 रुपयांमध्ये Galaxy Z ॲश्युरन्स मिळेल. खरं तर त्याची खरी किंमत खूप जास्त आहे.
इतकेच नाही तर सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 6 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना गॅलेक्सी वॉच अल्ट्रावर 18,000 रुपयांपर्यंत आणि गॅलेक्सी बड्स 3 च्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
हेदेखील वाचा- 2 स्मार्टफोनपैकी 1 स्मार्टफोनमध्ये असतो 50MP रिझोल्युशन कॅमेरा, यामागचे कारण काय?
Galaxy Z Fold 6 मध्ये 7.6 इंच Foldable Dynamic LTPO एमोलेड डिस्प्ले आहे. तर Galaxy Z Flip 6 मध्ये 6.7 इंच डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन Android 14 वर आधारित आहेत.
Galaxy Z Fold 6 मध्ये 50MP+10MP+12MP कॅमेरा आहे. तर Galaxy Z Flip 6 मध्ये 50MP+12MP कॅमेरा आहे.
Galaxy Z Fold 6 मध्ये 4,400mAh ची पावरफुल बॅटरी दिली आहे. तर Galaxy Z Flip 6 मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Galaxy Z Fold 6 256GB, 512GB आणि 1TB अशा स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर Galaxy Z Flip 6 256GB आणि 512GB या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.