लवकरच लाँच होणार Samsung चा ट्रिपल फोल्ड स्मार्टफोन! Huawei ला देणार टक्कर
काही महिन्यांपूर्वीच Huawei कंपनीने त्यांचा पहिला ट्रिपल फोल्ड स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर आता दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने देखील ट्रिपल फोल्ड स्मार्टफोनची लाँच करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सॅमसंगचा हा नवीन फोन Huawei च्या ट्रिपल फोल्ड स्मार्टफोनला टक्कर देणार का, अशी सर्वत्र चर्चा आहे. नुकतेच Huawei ने Mate XT Ultimate Edition लाँच केले होते, जे आता लवकरच लाँच होणाऱ्या सॅमसंगच्या फोनला टक्कर देणार आहे. याशिवाय Xiaomi, Honor आणि Oppo सारख्या काही इतर कंपन्या देखील त्यांच्या ट्राय-फोल्ड डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहेत.
हेदेखील वाचा- स्पॅम आणि फेक कॉल्सपासून आयफोन युजर्सची सुटका, ॲपलने घेतला महत्त्वाचा निर्णय
एका अहवालानुसार, सॅमसंग दोनदा फोल्ड होणाऱ्या स्क्रीनच्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनसह एंट्री-लेव्हल क्लॅमशेल-स्टाइलमधील फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. पुढील वर्षी हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ट्राय-फोल्ड स्मार्टफोनच्या कंपोनेंट्सची योजना करण्यात आली आहे. काही काळापूर्वी सॅमसंगने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन सीरीजमध्ये Galaxy Z Flip 6 आणि Galaxy Z Fold 6 फोन लाँच केले होते. मात्र कंपनीच्या अपक्षेपेक्षा या स्मार्टफोनची मागणी बाजारात अत्यंत कमी होती. (फोटो सौजन्य – X)
फोल्डेबल स्मार्टफोन सीरीजनंतर आता कंपनी ट्राय-फोल्ड डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहेत. फोल्डेबल स्मार्टफोनच्या बाजारपेठेत सॅमसंगचा वाटा सर्वाधिक आहे. मात्र या स्मार्टफोन्सना ग्राहकांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तरी देखील आता कंपनीने ट्रीपल फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखली आहे. ह्या स्मार्टफोनला ग्राहकांचा प्रतिसाद लाभणार का हे पाहणं मनोरंज ठरणार आहे.
हेदेखील वाचा- नोव्हेंबरमध्ये लाँच होणार Realme GT 7 Pro स्मार्टफोन, Qualcomm च्या लेटेस्ट प्रोसेसरसह करणार एंट्री
Huawei ने यावर्षी चीनमध्ये Mate XT Ultimate Design असलेला पहिला ट्राय-फोल्ड फोन लाँच केला. 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY 19,999 म्हणजेच अंदाजे 2,35,900 रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या 512 GB आणि 1TB स्टोरेज प्रकारांच्या किंमती अनुक्रमे CNY 21,999 म्हणजेच अंदाजे 2,59,500 रुपये आणि CNY 23,999 म्हणजेच अंदाजे 2,83,100 रुपये आहेत. त्याची स्क्रीन उघडल्यावर 10.2 इंच (3,184 x 2,232 पिक्सेल) असते. त्याची LTPO OLED स्क्रीन एकदा फोल्ड केल्यावर 7.9 इंच (2,048 x 2,232 पिक्सेल) आणि दुसऱ्यांदा फोल्ड केल्यावर 6.4 इंच (1,008 x 2,232 पिक्सेल) आहे.
बाहेरील बाजूस, स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि f/1.2 आणि f/4.0 मधील होल असलेला 50-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये f/2.2 अपर्चरसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 5.5x ऑप्टिकल झूम आणि f/3.4 अपर्चरसह 12-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी त्याच्या डिस्प्लेवर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.