फोटो सौजन्य -sony
लोकप्रिय कंपनी Sony ने प्रीमियमल क्वालिटी स्मार्ट TV लाँच केला आहे. BRAVIA 7 सीरीज असं स्मार्ट TV चे नाव आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि दमदार फीचर्ससह हा BRAVIA 7 सीरीज स्मार्ट TV लाँच करण्यात आला आहे. तुम्ही जर प्रिमियम क्वालिटी स्मार्ट टीव्हीच्या शोधात असाल, तर BRAVIA 7 सिरीज तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. चला तर मग BRAVIA 7 सीरीज असं स्मार्ट TV चे किंमत आणि दमदार फीचर्स पाहूयात.
BRAVIA 7 सिरीजमध्ये, Sony ने आपल्या युजर्ससाठी अनेक मॉडेल्स उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये 43 इंच ते 75 इंचापर्यंत विविध आकारांची मॉडेल्स उपलब्ध आहेत. हे सर्व टीव्ही 4K UHD डिस्प्लेला सपोर्ट करतात, जे 3840 x 2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतात. या डिस्प्लेमध्ये HDR10 आणि डॉल्बी व्हिजनसाठीही सपोर्ट आहे. ज्यामुळे व्हिज्युअल्सला 3D इफेक्ट मिळतो.
BRAVIA 7 सिरीजमध्ये X1 4K HDR प्रोसेसर आहे. यामुळे टिव्हीवरील चित्रांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होते. BRAVIA 7 सिरीजमध्ये डॉल्बी ॲटमॉस आणि डीटीएस डिजिटल सराउंड साउंडचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे युजर्सना इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव मिळतो.
BRAVIA 7 हा स्मार्ट टीव्ही Google TV सह येतो. जो युजर्सला एक कस्टमाइज्ड इंटरफेस देतो. BRAVIA 7 सिरीजमध्ये तुम्ही Netflix, Amazon Prime Video, Disney + Hotstar आणि YouTube सारख्या ॲप्सचा आनंद घेऊ शकता. हा टीव्ही व्हॉईस कंट्रोल आणि गुगल असिस्टंटलाही सपोर्ट करतो, ज्यामुळे व्हॉईस कमांडसह टीव्हीला नियंत्रित करता येतं.
BRAVIA 7 सिरीजमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, HDMI आणि USB पोर्टची सुविधा आहे. यासह, या टीव्हीमध्ये Chromecast देखील आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन किंवा टॅबलेट टिव्हीला कनेक्ट करू शकता. याशिवाय हा टीव्ही Apple AirPlay 2 आणि HomeKit ला सपोर्ट करतो.
Sony BRAVIA 7 सिरीजच्या किमती मॉडेल्सवर अवलंबून असतात. 43 इंच मॉडेलची किंमत सुमारे 50,000 रुपयांपासून सुरू होते, तर 75 इंच मॉडेलची किंमत सुमारे 2,00,000 रुपयांपर्यंत आहे. हा टीव्ही भारतातील प्रमुख रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.