Redmi Note 14 5G या दिवशी भारतात होणार लाँच, अॅडवांस AI फीचर्ससह मिळणार नवीन अनुभव
स्मार्टफोन कंपनी आणि टेक कंपनी Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने त्यांच्या नवीन स्मार्टफोनचा टिझर जारी केला आहे. तसेच यामध्ये नवीन स्मार्टफोन सिरीजची लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. Redmi ची आगामी स्मार्टफोन सिरीज Redmi Note 14 5G येत्या काही दिवसांतच भारतात लाँच केली जाणार आहे. कंपनीने आपल्या इंस्टाग्राम ब्रॉडकास्टिंग चॅनलवर याबाबत माहिती दिली आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सब-ब्रँड Redmi ने इंस्टाग्राम ब्रॉडकास्टिंग चॅनल, “फॉर द नोटेव्हरी” वर Redmi Note 14 5G सिरीजची लाँचिंग डेट जाहीर केली आहे. हि सिरीज 9 डिसेंबर रोजी भारतात लाँच केली जाणार आहे. टीझर पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की कंपनीची ही आगामी सिरीज प्रगत AI वैशिष्ट्ये आणि गेम-चेंजिंग कॅमेरा इनोव्हेशन्स’ सह लाँच केली जाणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Redmi Note 14 5G स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर आता ही स्मार्टफोन सिरीज भारतात देखील लाँच केली जाणार आहे. भारतात लाँच करण्यापूर्वी कंपनी या सिरीजमध्ये काही बदल करू शकते. फोनचं डिझाईन सारखंच असलं तरी देखील काही फीचर्स बदलू शकतात. स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. फोनचे फीचर्स आणि किंमत अधिकृतपणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र काही अपेक्षित फीचर्स समोर आले आहेत.
डिस्प्ले – Redmi Note 14 5G सिरीजमध्ये बेस मॉडेल, Redmi Note 14 Pro आणि Pro+ असे तीन स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. यातील Redmi Note 14 5G बेस मॉडेलमध्ये 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तर Redmi Note 14 Pro आणि Pro+ मधील डिस्प्ले वेगळे असू शकतात.
प्रोसेसर – Redmi Note 14 Pro आणि Pro+ मध्ये वेगवेगळे प्रोसेसर असू शकतात. प्रो मॉडेलमध्ये Snapdragon 7s Gen 3 चिपसेट असेल, जो खूप वेगवान आहे. Pro+ मॉडेलमध्ये Dimensity 7300 Ultra चिपसेट असू शकतो, जो खूप चांगला आहे. बेस मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर असेल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कॅमेरा – Pro आणि Pro+ या दोन्ही मॉडेलमध्ये तीन कॅमेरे असू शकतात. यापैकी दोन कॅमेरे दोन्ही फोनवर सारखेच असतील. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा यांचा समावेश आहे. पण तिसरा कॅमेरा वेगळा असेल. Pro+ मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा असेल, ज्याद्वारे तुम्ही झूम करू शकता आणि दूरच्या वस्तू पाहू शकता. प्रो मॉडेलमध्ये 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असेल, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी लहान गोष्टींचे फोटो घेऊ शकता.
बॅटरी – Pro आणि Pro+ या दोन्ही मॉडेल्समध्ये वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग स्पीड असतील. Pro+ मॉडेलमध्ये 90W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 6,200mAh बॅटरी पॅक असण्याची अपेक्षा आहे. प्रो मॉडेलमध्ये 5,500mAh बॅटरी असेल, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे दोन्ही फोन त्यांच्यासाठी चांगले आहेत ज्यांना फोनची बॅटरी जास्त काळ टिकण्याची गरज असते.