Smartphone Tips: स्मार्टफोनची बॅटरी सतत खराब होतेय? तुमच्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत
आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनशिवाय आपली अनेक कामं अपूर्ण असतात. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनची व्यवस्थित काळजी घेणं, फार महत्त्वाचं आहे. स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोनची बॅटरी. तुमचा स्मार्टफोन तुम्हाला वर्षानुवर्षे नव्या सारखा ठेवायचा असेल, तर तुम्हाला स्मार्टफोनच्या बॅटरीची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी खराब झाली तर तुमचा स्मार्टफोन काहीही फायद्याचा नाही. पण स्मार्टफोनच्या बॅटरीची काळजी कशाप्रकारे घ्यावी हे अनेकांना माहीत नसतं.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुमच्या काही छोट्या छोट्या चुकांमुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते. या चुका तुम्ही स्मार्टफोन चार्ज करताना टाळल्या पाहिजेत. तुमच्या काही छोट्या छोट्या चुकांमुळे फोन आणि बॅटरी या दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकते. त्यामुळे शक्यतो तुम्ही या चुका करणं टाळलं पाहिजे. (फोटो सौजन्य – pinterest)
सॉकेटमध्ये प्लग इन केल्यावर चार्जर वीज वापरत राहतो. तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्जरला कनेक्ट केला नसेल तर सॉकेटमध्ये चार्जर चालू ठेवू नका. यामुळे तुमचं विज बील वाढतं, तसेच तुमचा चार्जर देखील खराब होऊ शकतो. सॉकेटमध्ये चार्जर चालू ठेवल्याने ट्रान्सफॉर्मर उष्णता सोडतो, ज्यामुळे चार्जर गरम होऊन त्याचा स्फोट देखील होऊ शकतो. सॉकेटमध्ये चार्जर घालून ठेवनं तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरू शकतं.
जर तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी प्रत्येक वेळी 100 टक्के चार्ज करत असाल, तर तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होऊ शकतो. प्रत्येक बॅटरीला एक विशिष्ट चार्ज सायकल असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही फोन प्रत्येक वेळी 100 टक्के चार्ज केला तर हे चक्र लवकरच संपेल. बॅटरी चार्ज करण्यासाठी एक सामान्य नियम म्हणजे ती महिन्यातून एकदा पूर्णपणे चार्ज करणे आणि उर्वरित वेळेत ती 20% आणि 80% दरम्यान ठेवणे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी सतत 100 टक्के चार्ज करत असाल तर आत्ताच थांबा.
तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे संपू देऊ नका. अनेकजण असे असतात जे स्मार्टफोनची बॅटरी 0 टक्के झाल्यानंतर फोन चार्जिंगला लावतात. पण असं केल्याने बॅटरीवर परिणाम होतो आणि स्मार्टफोन लवकरच खराब होऊ शकतो. नवीन लिथियम बॅटरी चार्ज सायकलमध्ये काम करतात. त्यामुळे रोज बॅटरी 0 टक्के झाल्यानंतर फोन चार्ज केल्यास फोनचं आयुष्य कमी होऊ शकतं.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्ही तुमचा फोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवत असाल तर तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होऊ शकतो. कारण स्मार्टफोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवल्यास बॅटरी जास्त चार्ज होईल आणि तुमची वीज वाया जाईल. अशा परिस्थितीत फोन गरम होऊन त्याचा स्फोट देखील होऊ शकतो.
तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसोबत एक चार्जर दिला जातो, जो कंपनीचा ओरिजीनल चार्जर असतो. हा चार्जर तुमच्यासाठी स्मार्टफोनसाठी बेस्ट असतो. त्यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन इतर कोणत्याही ब्रँडच्या चार्जरने किंवा स्वस्त चार्जरने चार्ज करणं टाळा.