Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात हरवेलल्या लोकांना आता शोधणं होईल सोपं? AI ची ही सुविधा करणार मदत
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 25 फेब्रुवारी या काळात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. यंदा कुंभमेळ्यात 40 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात तुफान गर्दी असणार यात काही शंकाच नाही. कुंभमेळ्याच्या या मोठ्या गर्दीत एखादी व्यक्ती तिच्या कुटुंबापासून दुरावली तर त्याला शोधण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. यासाठी संपूर्ण कुंभमेळ्यात AI कॅमेरे बसविण्यात आले आहेत. AI कॅमेऱ्यांच्या मदतीने कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी मदत होणार आहे.
शॉपिंगसाठी तयार आहात ना? या दिवशी सुरू होतोय Flipkart चा Republic Day स्पेशल सेल!
प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यादरम्यान एखादी व्यक्ती तिच्या कुटुंबापासून दुरावली, तर अशा लोकांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण कुंभमेळ्यात 5 कंप्यूटराइज्ड लॉस्ट अँड फाऊंड केंद्रे उभारण्यात आली आहेत. लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी 328 AI कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे 24 तास कार्यरत राहतील. याशिवाय पाळत ठेवण्यासाठी 2,700 सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
यावेळी कुंभमेळ्यामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कोणताही भाविक त्याच्या कुटुंबापासून किंवा त्याच्यासोबत असलेल्या लोकांपासून विभक्त झाल्यास त्याची माहिती लॉस्ट अँड फाऊंड केंद्राला द्यावी लागेल. येथे नोंदणी होताच AI कॅमेरे कामाला लागतील. हे कॅमेरे चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने फोटो पाहून हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील. कुंभमेळा परिसरात विभक्त झालेल्या लोकांच्या राहण्यासाठी 100 खाटांचा खास हॉल तयार करण्यात आला आहे. याशिवाय लहान मुलांसाठी खास खोल्या बनवण्यात आल्या आहेत, जिथे ते आपल्या कुटुंबाची वाट पाहत खेळण्यांसोबत खेळू शकतात.
विभक्त किंवा हरवलेल्या लोकांच्या मदतीसाठी मानसशास्त्रज्ञांचे पथकही मेळ्यात तैनात केले जाईल. ही टीम विभक्त झालेल्या लोकांना काउंसलिंग करून शांत राहण्यास मदत करेल. याशिवाय विभक्त झालेल्या आणि बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी कुंभमेळ्यात कोणी त्याच्या कुटूंबापासून दूर झाला, तर त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले जाणार आहेत.