AI व्हॉट्सॲपवरही दाखवणार चमत्कार! रोल आऊट झाले दोन नवीन फीचर्स, अशा प्रकारे ठरतील फायदेशीर
व्हॉट्सॲप जगभरातील लाखो वापरकर्त्यांमध्ये सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग ॲप बनले आहे. युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी, कंपनी वेळोवेळी व्हॉट्सॲपमध्ये नवीन फीचर्स रोल आऊट करत असते. अलीकडेच कंपनीने व्हिडिओ कॉलसाठी काही नवीन आणि खास फीचर्स सादर केले होते. त्यानंतर आता कंपनी व्हॉट्सॲप बिझनेससाठी एक नवीन फीचर आणत आहे, जे व्हॉट्सॲपद्वारे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे.
Lava Blaze Duo: AI कॅमेऱ्यासह Lava चा डबल डिस्प्लेवाला स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
कंपनी आता ऑटोमॅटिक रिप्लायसाठी AI इंटीग्रेट करत आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या काही प्रश्नांची तात्काळ उत्तरे मिळू शकतील आणि त्यामुळे त्यांचा त्या व्यवसायावरील विश्वास वाढेल. याशिवाय कंपनीने एक कॉलिंग फीचर देखील रोल आऊट केलं आहे. त्यामुळे आता व्हॉट्सॲप युजर्सना AI चा आनंद घेता येणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी बिझनेस प्लॅटफॉर्म कनेक्शन आणि AI-पावर्ड रिप्लाय हे वैशिष्ट्य आणत आहे. या नवीन फीचर्समुळे बिझनेस प्लॅटफॉर्म कनेक्शनमधील युजर्सची एक मोठी समस्या सोडवली गेली आहे. आतापर्यंत, बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे त्यांची अकाऊंट मॅनेज करणारे युजर्स मोबाइल ॲपद्वारे त्यांच्या व्हॉट्सॲप अकाऊंटमध्ये प्रवेश करू शकत नव्हते. नवीन फीचर अंतर्गत, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, व्यवसायांना व्हॉट्सॲप बिझनेस ॲप आणि बिझनेस प्लॅटफॉर्मवरून थेट मोबाइलवरून अकाउंट एक्सेस करता येईल.
नवीनतम अपडेटमध्ये, वापरकर्ते त्यांच्या व्यवसाय ॲप्सशी AI कनेक्ट करण्यात सक्षम होतील. यानंतर, AI त्यांच्या ग्राहकांना सामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. हे उत्तर AI ने दिले असल्याचेही ग्राहकांना सांगितले जाईल. व्यवसायातील कस्टमर सर्विस सुधारण्यासाठी हे वैशिष्ट्य सुरू करण्यात आले आहे. यामुळे, व्यवसाय त्यांच्या ग्राहकांशी अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतील आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी लागणारा वेळही कमी होईल.
व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर सध्या बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते हळूहळू इतरांसाठी आणले जाईल. व्हॉट्सॲपची नवीनतम वैशिष्ट्ये मिळविण्यासाठी, तुमचे ॲप सतत अपडेट करत रहा.
व्हॉट्सॲप पुन्हा एकदा आपले कॉलिंग फीचर सुधारणार आहे, खासकरून जे वापरकर्ते मोबाईल नेटवर्कऐवजी व्हॉट्सॲप कॉलिंगचा अधिक वापर करतात, त्यांच्यासाठी हे नवीन फीतर रोल आऊट केलं जाणार आहे. या नवीन अपडेटमुळे कॉलिंगचा अनुभव आणखी चांगला होईल.
व्हॉट्सॲप लवकरच आयफोन वापरकर्त्यांसाठी एक नवीन कॉल डायलर फीचर रोल आऊट करणार आहे. हा डायलर आयफोनच्या डीफॉल्ट डायलरसारखा दिसेल आणि काम करेल. WABetaInfo ने आपल्या एका रिपोर्टमध्ये या फीचरची माहिती दिली आहे. हा नवीन कॉल डायलर iOS साठी नवीनतम व्हॉट्सॲप बीटा आवृत्तीमध्ये दिसला आहे.
या नवीन फीचरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयफोन वापरकर्ते आता अशा लोकांनाही व्हॉट्सॲप कॉल करू शकतील ज्यांचे मोबाइल नंबर त्यांच्या संपर्क यादीमध्ये सेव्ह नाहीत. म्हणजेच आता व्हॉट्सॲप कॉल करण्यासाठी आधी नंबर सेव्ह करण्याची गरज भासणार नाही.