Vi 5G Service: फायनली! Vi ने लाँच केली 5G सर्विस! 'या' 17 शहरांमध्ये सेवा सुरू, जाणून घ्या संपूर्ण यादी
टेलिकॉम कंपनी Vi ने फायनली त्यांची 5G सर्विस भारतात लाँच केली आहे. जिओ आणि एअरटेल या कंपन्यांची 5G सर्विस आधीपासूनच सुरु आहे. तर बीएसएनएल देखील त्यांची 5G सर्विस लाँच करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच आता Vi ने त्यांची 5G सर्विस भारतात लाँच केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून Vi युजर्स कंपनीच्या 5G सर्विसची वाट बघत होते. मात्र आता फायनली ही सर्विस सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता Vi युजर्सना देखील फास्टेस्ट इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे.
Lava Blaze Duo: AI कॅमेऱ्यासह Lava चा डबल डिस्प्लेवाला स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
Vodafone Idea (Vi) ने अखेर भारतात त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. Vi ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम सर्विस कंपनी आहे. Vi ने 17 दूरसंचार मंडळांमध्ये 5G कनेक्टिव्हिटी ऑफर करण्यास सुरुवात केली. एअरटेल आणि जिओने ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांच्या सेवा सुरू केल्या. त्यामुळे Vi युजर्स देखील कंपनीच्या 5G सर्विसची आतुरतेने वाट बघत होते. मात्र आता अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. (फोटो सौजन्य – Vi)
टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, Vi चे 5G नेटवर्क 3.3GHz आणि 26GHz स्पेक्ट्रम बँड वापरते. प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही वापरकर्ते 5G कनेक्टिव्हिटीचा आनंद घेण्यास सक्षम असतील. कंपनीचे हे प्रारंभिक लाँच काही विशिष्ट ठिकाणी मर्यादित आहे.

Vi ने भारतातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. तुम्ही या शहरांमध्ये 5G वापरू शकता:
जरी 5G सध्या फक्त काही ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु Vi साठी ही एक मोठी उपलब्धी आहे. कंपनीने 5G नेटवर्कचा विस्तार केल्यामुळे, येत्या काही महिन्यांत लाखो वापरकर्त्यांना उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वेगवान इंटरनेटचा अनुभव येईल.






