Redmi Note 13: Note 14 लाँच होताच Note 13 झाला स्वस्त! कसा घ्याल ऑफर्सचा फायदा, जाणून घ्या
स्मार्टफोन कंपनी Xiaomi ची नवीन सिरीज Redmi Note 14 आज भारतात लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ 5G असे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. तीन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. तसेच या स्मार्टफोनचे फीचर्स देखील कमाल आहेत. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन लाँच होताच आता Redmi Note 13 स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे.
Redmi Note 14 Series: रेडमीची नवीन सिरीज भारतात लाँच, दमदार फीचर्स मिळणार इतक्या किंमतीत
Redmi Note 14 5G सीरिज लाँच होताच आता जुन्या Redmi 13 च्या किमतींमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन तुम्ही EMI पर्यायावर देखील खरेदी करू शकता. तुम्ही बजेट सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Redmi Note 13 एक चांगला पर्याय ठरणार आहे. (फोटो सौजन्य – X)
108MP कॅमेरा आणि 5030 mAh बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या फोनच्या खरेदीवर 2200 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. कंपनीने Redmi 13 चा 6GB + 128GB व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लाँच केला होता. परंतु आता ऑफर्स आणि डिस्काऊंटसह हा व्हेरिअंट कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही Redmi 13 चा 6GB + 128GB व्हेरिअंट 12,283 रुपयांना खरेदी करू शकता.
Redmi 13 चा 6GB + 128GB व्हेरिअंटच्या खरेदीवर 1,500 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंटही दिला जात आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो. हवाईयन ब्लू, ब्लॅक डायमंड आणि स्टायलिश ऑर्किड गुलाबी रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या फोनच्या 256 GB व्हेरिअंटवरही सूट उपलब्ध आहे. Redmi 13 5G चा EMI सह देखील लाभ घेता येईल.
डिस्प्ले- Redmi 13 5G स्मार्टफोनमध्ये 6.79 इंचाचा FHD + LCD डिस्प्ले आहे, तो 90Hz ते 120Hz, कॉर्निंग गोरिला ग्लास 3 संरक्षण आणि वाइडवाइन L1 पर्यंत ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
प्रोसेसर- या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे, जो Adreno 613 GPU, 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह जोडलेला आहे.
IRCTC Down: ऐन तिकीट बुकींगवेळी आयआरसीटीसी वेबसाइट डाउन, प्रवशांनी व्यक्त केला संताप
कॅमेरा- यात 108MP मुख्य सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरासह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 13MP फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी आणि चार्जिंग- या फोनमध्ये 5,030mAh पर्यंतची बॅटरी आहे, जी 33W चार्जिंगला सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटी- या फोनमध्ये ड्युअल 5G सिम सपोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी टाइप-सी पोर्टचा पर्याय आहे.