नंबर सेव्ह न करताही दिसणार कॉलरचं नाव, ही नवीन सर्व्हिस लवकरच होणार सुरू; सरकारचे टेलिकॉम कंपन्याना आदेश
देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर करत आहेत. या सर्व घटनांमुळे सामान्य माणसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी सरकार वेळोवेळी कठोर पावले उचलत असते. आता देखील या वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने एक नवीन सर्व्हिस सुरू करण्याचं निर्णय घेतला आहे.
शॉपिंगचा नवा ट्रेंड सेट करतोय Quick Commerce! झपाट्याने वाढतेय लोकप्रियता, काय आहे कारण
याबाबत सरकारने टेलिकॉम कंपन्याना आदेश देखील दिले आहेत. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिलेल्या आदेशानुसार आता एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास आपल्याला त्या व्यक्तीचं नाव आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. देशातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये डिजिटल अरेस्ट, ओटोपी फ्रॉड, स्कॅन यांचा सामावेश आहे. या घटनेमुळे सामान्य लोकांची फसणूक होते, आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या घटना रोखण्यासाठी आता सरकार कठोर पाऊलं उचलत आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
आता सरकारने अनोळखी नंबरवरून येणारे कॉल थांबवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. वास्तविक, सरकारने दूरसंचार कंपन्यांना आदेश दिले आहेत. हा आदेश लागू झाल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांना नंबर सेव्ह नसला तरीही कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दाखवावे लागेल. सायबर फसवणुकीच्या अनेक घटना अनोळखी कॉलमुळे घडतात. ज्यामुळे सामान्य माणसांची फसवणूक होते.
आजकाल अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलमुळे फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. काही लोक हे कॉल्स नकळत किंवा लालसेपोटी उचलतात आणि नंतर सायबर ठगांच्या तावडीत सापडतात. हे पाहता सरकारने दूरसंचार कंपन्यांना फोन करणाऱ्याचे नाव आणि मोबाईल नंबर दाखवण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा दाखवणाऱ्या कंपन्यांना येत्या 1 ते 2 महिन्यांत अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना नावासह मोबाईल नंबर दाखवण्याची सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये याची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. कंपन्या त्यांच्या स्वत:च्या नेटवर्कवर नाव दाखवण्यास सक्षम आहेत, परंतु इतर नेटवर्कवर नाव दाखवण्यात हलगर्जीपणा करतात.
तुमच्या स्मार्टफोनमधील Google Chrome सतत हँग होतोय का? फॉलो करा या 5 टिप्स आणि संपेल तुमची समस्या
आता सरकारकडून आदेश आल्यानंतर कंपन्या लवकरच ही सेवा सुरू करू शकतील, अशी अपेक्षा आहे. या सेवेमुळे लोकांना नाव आणि कॉल करणाऱ्या व्यक्तीचा नंबर कळू शकेल. यामुळे अनोळखी लोकांकडून येणाऱ्या स्पॅम आणि कॉल्सला आळा घालण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे. सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले हे पाऊल फायद्याचं ठरू शकते.