टेलिग्राम सीईओ Pavel Durov च्या अटकेनंतर टेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता (फोटो सौजन्य - pinterest)
टेलिग्रामचा सीईओ Pavel Durov याला शनिवारी फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. मॉडरेटरच्या कमतरतेमुळे मेसेजिंग ॲपवर गुन्हेगारी कृत्ये विनाअडथळा पुढे जाऊ शकतात. याच प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी Pavel Durov याला फ्रान्समध्ये अटक केली. Pavel Durov च्या अटकेनंतर आता इतर टेक अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना पाहायला मिळतं आहे. आपल्याला कोणत्या तांत्रिक कारणामुळे जबाबदार धरलं जाऊ शकतं का? या कारणामुळे आपल्याला अटक होऊ शकते का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
हेदेखील वाचा- प्रचंड चर्चेत असणाऱ्या टेलिग्रामच्या बदनामीची कारणं माहीत आहे का? पेपर लीक, स्टॉक फसवणूक, खंडणी आणि बरंच काही
याशिवाय फेसबुकचा प्रमुख Mark Zuckerberg ला देखील युरोपमध्ये गेल्यावर अटक करण्यात येईल का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. Pavel Durov नंतर आता कोणत्या टेक अधिकाऱ्यावर कारवाई होणार, अशी चिंता सर्वत्र निर्माण झाली आहे. प्लॅटफॉर्मवर घडणाऱ्या घटनांसाठी तंत्रज्ञान अधिकाऱ्यांना जबाबदार धरता येईल का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. या सर्व परिस्थितीवर आता सोशल मीडिया ॲप टेलिग्रामने स्पष्टीकरण दिलं आहे.
कंपनीने सांगितलं आहे की, तांत्रिक अधिकाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. टेलिग्राम EU कायद्यांचे पालन करते आणि प्लॅटफॉर्म किंवा त्याचे मालक त्याच्या गैरवर्तनासाठी जबाबदार आहेत असा दावा करणे मूर्खपणाचे आहे. सद्यस्थितीत तांत्रिक अधिकाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. ऐतिहासिकदृष्ट्या, प्लॅटफॉर्मच्या उल्लंघनासाठी व्यक्तींऐवजी कंपन्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
हेदेखील वाचा- टेलिग्राम सिईओ Pavel Durov ला म्हटलं जातं Russian Zuckerberg! जाणून घ्या त्याच्या रहस्यमय जीवनाविषयी
यूएस आणि युरोपला त्यांच्या कंपन्यांच्या क्रियाकलापांसाठी व्यक्तींवर खटला भरण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. विशेषत: संप्रेषण सभ्यता कायद्याच्या कलम 230 सारख्या यूएस कायद्यांसह, जे इंटरनेट प्लॅटफॉर्मला हानिकारक भाषणासाठी जबाबदार होण्यापासून संरक्षण करते.
टेलिग्रामचा सीईओ Pavel Durov याला शनिवारी फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. तो फ्रेंच अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की त्याच्यावर टेलीग्रामवरील क्रियाकलापांशी संबंधित अनेक संभाव्य आरोपांचा समावेश आहे, ज्यात औषध तस्करी, फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग, गुन्हेगारी व्यवहार सुलभ करणे आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देणे समाविष्ट आहे. Pavel Durov याला फ्रान्समध्ये ताब्यात घेण्यात आल्याने भारतात चिंता वाढली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडून टेलिग्रामबाबत माहिती मागवली आहे.
टेलिग्राम भारतातही कोणत्या प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करत आहे का याची भारत सरकार चौकशी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून टेलिग्रामची प्रचंड बदनामी सुरु आहे. टेलिग्रामवर विविध आरोप लावले जात आहेत. एवढचं नाही तर भारतात टेलिग्राम बंद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. कारवाईनंतर टेलिग्रामबाबत अनेक तर्क वितर्क सुरु झाले. टेलिग्रामच्या गुन्ह्यांबद्दल चौकशी सुरु झाली. या चौकशीवेळी टेलिग्राम अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं. यामध्ये पेपर लीकपासून ते शेअर बाजारातील फेरफारपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे टेलिग्राम सध्या अडचणीत सापडलं आहे. सायबर तज्ञ आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी टेलीग्रामची तुलना डार्क वेबशी केली आहे.