WhatsApp Tricks: या आहेत WhatsApp च्या काही जबरदस्त ट्रीक्स, चॅट्स करताना ठरतील फायदेशीर
व्हॉट्सॲपचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. अनेक वेळा, व्हॉट्सॲप वापरकर्त्याच्या फोनमध्ये घरातील तसेच कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांचे नंबर असतात. व्हॉट्सॲपचा वापर ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगसाठी केला जातो, पण त्याहूनही अधिक फोटो आणि व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर शेअर केले जातात. जर तुम्हाला कोणाला काहीही पाठवायचे असेल तर तुमच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे व्हॉट्सॲप. आता आम्ही तुम्हाला काही अशा ट्रीक्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला चॅटींगसाठी फायदेशीर ठरू शकतात.
हेदेखील वाचा- पाण्यामध्ये फोटो काढण्याची इच्छा आता पूर्ण होणार, Realme घेऊन येतोय अंडरवॉटर फोटोग्राफी मोड स्मार्टफोन
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp जगभरातील लाखो लोक वापरतात. वापरकर्त्याचा अनुभव मजेदार बनविण्यासाठी, WhatsApp अनेक वैशिष्ट्ये ऑफर करते ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्याला मेसेज पाठवायचा असेल तर तो नंबर आधी सेव्ह करणे महत्त्वाचे आहे. मात्र, हे काम मोबाईल नंबर सेव्ह न करता देखील पूर्ण होऊ शकते आणि तेही एक नाही तर अनेक प्रकारे. जर तुम्हालाही नंबर सेव्ह न करता एखाद्याला मेसेज पाठवायचा असेल, तर त्यासाठी हे 4 मार्ग आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
नंबर सेव्ह न करता व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्याचा पहिला मार्ग म्हणजे WA.me लिंकच्या मदतीने मेसेज पाठवणे. यासाठी तुम्हाला URL (https://wa.me/phonenumber) वापरावे लागेल आणि फोन नंबरच्या जागी देशाच्या कोडसह तो मोबाइल नंबर टाइप करावा लागेल. ज्यावर तुम्हाला मॅसेज पाठवायचा आहे. यानंतर क्रोमवर सर्च करून चॅटवर क्लिक करावे लागेल. आता या नंबरचा चॅट बॉक्स ओपन होईल आणि तुम्ही सहज चॅट करू शकाल.
तुम्ही नंबर सेव्ह न करता स्वतःला मेसेज पाठवू शकता, ते कसे? त्यासाठी एक सोपा मार्ग आहे. सर्वप्रथम, New Chat वर क्लिक करा आणि सर्वात वरती “Message Yourself” वर टॅप करून, तुम्हाला ज्या नंबरवर मॅसेज करायचा आहे तो नंबर पाठवा. नंबर पाठवल्यानंतर त्यावर क्लिक करा आणि “चॅट विथ दिस नंबर” वर क्लिक करा. असे केल्याने तुमचे काम पूर्ण होईल.
हेदेखील वाचा- Google Maps vs MAPPLS: भारतीयांसाठी कोणता नेव्हिगेशन ॲप ठरेल सर्वोत्तम, जाणून घ्या
Truecaller ॲप वापरून, तुम्ही नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेजही पाठवू शकता. यासाठी सर्वप्रथम Truecaller ॲप ओपन करा आणि ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्याचा नंबर शोधा. यानंतर, नाव प्रोफाइलवर टॅप करा आणि नंतर व्हॉट्सॲप आयकॉनवर टॅप करा. आता “Send WhatsApp Message” चा पर्याय असेल. त्यावर क्लिक करून तुम्ही मॅसेज पाठवू शकाल.
ग्रुपमध्ये तुमच्यासोबत कोणी कॉमन असेल आणि तुम्हाला नंबर सेव्ह न करता त्याला मेसेज पाठवायचा असेल, तर पद्धत अगदी सोपी आहे. ग्रुप चॅट उघडा आणि पार्टिसिपेंटवर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्याचा नंबर शोधा. आता त्याच्या प्रोफाइलवर क्लिक करा आणि नंतर मॅसेजवर क्लिक करा.