फोटो सौजन्य - pinterest
Telegram users alert: लोकप्रिय मॅसेजिंग ॲप Telegram चे लाखो युजर्स आहेत. सिनेमा बघण्यासाठी, चॅटिंग किंवा कॉल करण्यासाठी, फोटो डाऊनलोड करण्यासाठी, गाणी शोधण्यासाठी Telegram चा वापर केला जातो. एखादा सिनेमा आपल्याला YouTube वर नाही पाहायला मिळाला तरी तो सिनेमा आपण Telegram वर नक्कीच पाहू शकतो. Telegram वर वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमांसाठी वेगवेगळे ग्रुप असतात. ज्यामुळे युजर्सना ज्या प्रकारचा सिनेमा पाहायचा आहे, तर युजर्स तो ग्रुप जॉईन करू शकतात. पण आता लोकप्रिय ॲप Telegram मध्ये एक मोठी त्रुटी आढळून आली आहे. सायबर स्कॅमर तुम्हाला एक फाईल पाठवतात. या फाईल व्हिडीओसारख्या दिसतात मात्र प्रत्यक्षात यामध्ये मालवेअरचा धोका असतो. ही फाईल डाऊनलोड केल्याास तुमच्या फोनमधील डेटा हॅक होऊ शकतो.
हेदेखील वाचा- ‘या’ टॅबवरून निर्मला सीतारामन यांनी सादर केलं बजेट; जाणून घ्या काय आहे किंमत
ESCET संशोधकांनी याबाबत एक अलर्ट जारी केला आहे. त्यांनी सांगितलं आहे की, हॅकर्स EvilVideo नावाचा मालवेअर वापरत आहेत आणि 30 सेकंदाच्या व्हिडिओच्या रूपात एक धोकादायक फाइल पाठवत आहेत. या फाइल्स टेलिग्रामवर ग्रुप किंवा प्रायव्हेट चॅटवर पाठवल्या जात आहेत. एवढेच नाही तर त्याहून धोकादायक म्हणजे एखाद्याने ऑटोमॅटिक डाऊनलोड ऑन केले असेल तर फाईल चॅट ओपन होताच ती फाईल त्या व्यक्तिच्या फोनमध्ये आपोआप डाउनलोड होईल. ही फाईल एखाद्या व्हिडीओसारखी दिसत असली तरी त्यामध्ये मालवेअरचा धोका आहे. ही फाईल तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड केल्यास तुमच्या फोनमधील डेटा हॅक होऊ शकतो.
संशोधकांनी पुढे सांगितलं की, डाऊनलोड झाल्यानंतर जेव्हा युजर्स ही फाईल उघडतात तेव्हा टेलिग्रामवर हा व्हिडिओ प्ले होत नसल्याचे दिसून आलं आहे. पण ते इतर कोणत्याही ॲपवरून प्ले केले जाऊ शकते. तुम्ही दुसऱ्या ॲपला व्हिडिओ प्ले करण्यास अनुमती दिल्यास, तुमच्या फोनमध्ये हानिकारक ॲप इंस्टॉल होतं. या ॲपव्दारे युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. व्हिडीओ प्ले करण्यासाठी तुम्ही ॲप डाऊनलोड केल्यास तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात सहजपणे अडकू शकता, त्यानंतर ते तुमचा डेटा चोरू शकतात, ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
हेदेखील वाचा- लवकरच लागू होणार राईट टू फ्री इंटरनेट! नागरिकांना मिळणार मोफत इंटरनेट सेवा
Android फोनवरील Telegram च्या जुन्या वर्जनवर (10.14.5 पूर्वीच्या) या त्रुटी आढळत आहेत. त्यामुळे युजर्सनी सर्वात आधी त्यांचं Telegram ॲप अपडेट करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचं Telegram ॲप अपडेट केलं नसेलं तर तुमचा डेटा हॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वात आधी तुमचा Telegram ॲप अपडेट करा. तसेच Telegram मधील ऑटोमॅटिक डाऊनलोड सेटिंग बंद करा. तसेच अज्ञात स्त्रोतांकडून ॲप्स डाऊनलोड करणं टाळा. कोणताही संशयास्पद व्हिडीओ किंवा फाईल डाऊनलोड करण्यापूर्वी किंवा उघडण्यापूर्वी काळजी घ्या. Telegram च्या नवीन वर्जनमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्या नसल्या तरी युजर्सनी काळजी घेणं गरजेचं आहे.