सौजन्य : Nirmala Sitharaman (X Account)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. मंगळवारी (23 जुलै) रोजी सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात वित्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. नवीन कर प्रणाली, मुद्रा लोन, सोन्या-चांदीवरील शुल्क, तरूणांना इंटर्नशिप, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरात कपात, शेतकरी आणि महिला वर्ग या सर्वांसाठी अर्थसंकल्पात विशेष घोषणा करण्यात आल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या तीन वेळा पेपरलेस बजेट सादर केलं आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी ॲपल आयपॅड मॉडेलमध्ये 2024 चे बजेट सादर केलं.
हेदेखील वाचा – Budget 2024: मोबाईल चार्जर आणि हँडसेटसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार
पेपर लेस बजेटची सुरुवात 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पापासून झाली. जिथे बजेट सादर करण्यासाठी iPad चा वापर केला जातो. आज देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Apple iPad वर अर्थसंकल्प सादर केला आहे. या Apple iPad चे फीचर्स आणि किंमत तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया निर्मला सीतारामन यांनी ज्या Apple iPad वर अर्थसंकल्प सादर केला त्याचे फीचर्स आणि किंमत.
लोकप्रिय आणि सर्वात मोठी टेक कंपनी Apple चे हे 10th gen iPad मॉडेल 64 GB आणि 256 GB स्टोरेज अशा 2 व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. Apple च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,900 रुपये (वाय-फाय) आहे आणि वाय-फाय व सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 49,900 रुपये आहे. तर 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,900 रुपये (वाय-फाय) आहे आणि वाय-फाय व सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 64,900 रुपये आहे.
हेदेखील वाचा – iPhone 17 Series चे डिटेल्स लीक! जाणून घ्या किंमत आणि भन्नाट फीचर्स
तुम्ही Apple iPad ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. Amazon वर त्याच्या 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 32,900 रुपये आहे, तर Wi-Fi आणि सेल्युलर व्हेरिएंटसाठी तुम्हाला 46,900 रुपये द्यावे लागतील. त्याच्या 256 GB व्हेरिएंटची किंमत 48,900 रुपये (Wi-Fi) आहे, तर Wi-Fi आणि सेल्युलर व्हेरिएंटसाठी तुम्हाला 61,900 रुपये द्यावे लागतील. तसेच ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर 64 जीबी व्हेरिएंट 31,999 रुपयांना (Wi-Fi) उपलब्ध आहे. तसेच Wi-Fi आणि सेल्युलर व्हेरिएंट 46,900 रुपयांना उपलब्ध असेल. 256 GB (Wi-Fi) वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर ते फ्लिपकार्टवर 46,900 रुपयांना उपलब्ध आहे. तर Wi-Fi आणि सेल्युलर व्हेरियंट 61,900 रुपयांना उपलब्ध असेल.
Apple 10th gen iPad मध्ये Apple A14 बायोनिक SoC आहे, जो 2020 मधील iPhone 12 मध्ये देखील समाविष्ट होता. Apple 10th gen iPad A14 बायोनिक SoC वर आधारित आहे. या SoC मध्ये 16-कोर न्यूरल इंजन आहे.