फोटो सौजन्य- pinterest
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामचा सिईओ पावेल दुरोव याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. पावेल दुरोव एक-दोन नव्हे तर 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप आहे. पावेल दुरोवने स्वतःच हा खुलासा केला आहे. याबाबत त्याने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून 12 देशांत माझी शंभरहून अधिक मुलं आहेत, असं पावेल दुरोव याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेदेखील वाचा- उपराष्ट्रपती कमल हॅरिस यांचा डिपफेक व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी Elon Musk अडचणीत
या पोस्टनंतर पावेल दुरोव चांगलाच चर्चेत आहे. सिईओ पावेल दुरोवचं अद्याप लग्न झालेलं नाही. अशातच त्याने आता खुलासा केला आहे की, तो 100 हून अधिक मुलांचा बाप आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. पावेल दुरोवच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पावेल दुरोव याचा टेलिग्रामवर चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यामातून तो टेलिग्राम युजर्ससोबत अनेक गोष्टी शेअर करत असतो. नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, तो 100 हून अधिक मुलांचा बाप आहे.
हेदेखील वाचा-Google ची एक चूक युजर्सना पडली महागात; 1.5 करोड लोकांचे पासवर्ड धोक्यात
पावेल दुरोव याने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मला 100 पेक्षा जास्त बायोलॉजिकल मुलं आहेत. कधीही लग्न न केलेल्या आणि एकटे राहणे पसंत करणाऱ्या व्यक्तीला हे कसं शक्य आहे? 15 वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने माझ्याकडे एक विचित्र मदत मागितली होती. त्याला मूल होण्यात अडचण येत होती, त्यामुळे त्याने मला स्पर्म डोनेट करण्याची विनंती केली. आधी मला वाटलं की तो माझी मस्करी करत आहे, मात्र त्यानंतर मी त्याची अडचण समजून घेतली. जेव्हा माझा मित्र मला स्पर्म डोनेट करण्यासाठी क्लिनिकमध्ये घेऊन जात होता तेव्हा मला सांगण्यात आलं की, माझ्या स्पर्ममुळे मित्राला मदत होऊ शकते. आधी मला ही गोष्ट विचित्र वाटली, पण नंतर मी स्पर्म डोनेट करण्यासाठी होकार दिला.
पावेल दुरोव याने पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, आता मला समजलं आहे की, माझी 12 देशांमध्ये 100 हून अधिक बायोलॉजिकल मुंल आहेत. मी आता माझा डीएनए ओपन सोर्स करण्याची योजना आखत आहे जेणेकरून माझी बायोलॉजिकल मुलं एकमेकांना सहज शोधू शकतील. मला माहित आहे की हे एक जोखमीचे काम आहे, परंतु मला डोनर बनल्याचा कोणताही पश्चाताप नाही. कारण निरोगी स्पर्मची कमतरता ही जगभरात गंभीर समस्या बनली आहे आणि अशा परिस्थितीत मी डोनर बननण्याचे पाऊल उचलले याबाबत मला अभिमान आहे. मला लोकांना स्पर्म डोनेट करण्याच्या संकल्पनेसाठी जागृत करायचं आहे आणि आणि अधिक निरोगी पुरुषांना ते करण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे. जेणेकरून, मुले जन्माला घालण्यासाठी संघर्ष करत असलेल्या कुटुंबांना आनंदाचा पर्याय देता येईल.