फोटो सौजन्य - pinterest
टेस्ला आणि स्पेसएक्सचा मालक व सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X चा मालक Elon Musk नेहमीच कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असतो. आता Elon Musk पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. Elon Musk ने उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. Elon Musk ने 2 दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र आता या व्हिडीओमुळे Elon Musk वर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा डीपफेक व्हिडीओ शेअर केल्याने Elon Musk अडचणीत सापडला आहे.
हेदेखील वाचा- तुमच्या एका चुकीमुळे फोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब! अशा प्रकारे घ्या योग्य काळजी
Elon Musk ने शेअर केलेल्या डीपफेक व्हिडीओमध्ये AI च्या मदतीने जनरेट केलेला व्हॉईस ओव्हर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांच्याबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या आहेत. कमला हॅरिस अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. कमला हॅरिस यांची खिल्ली उडवण्यासाठी Elon Musk ने हा व्हिडीओ शेअर केल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओमध्ये कमला हॅरिस राष्ट्रपती पदाच्या उमेदवार बनून देश चालवण्याविषयी बोलत आहेत.
हेदेखील वाचा- Xiaomi चे ‘हे’ फोन End Of Life लिस्टमध्ये झाले सहभागी; तुमचा फोन तर नाही ना जाणून घ्या
व्हिडिओमध्ये हॅरिस स्वतःबद्दल नकारात्मक बोलतांना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना Elon Musk ने म्हटलं आहे की, हे आश्चर्यकारक आहे. यासोबतच मस्कने कॅप्शनमध्ये हसणारा इमोजी देखील वापरला आहे. हा पॅरोडी व्हिडिओ @MrReaganUSA नावाच्या X हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता, जो Musk ने शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये कमला हॅरिस म्हणत आहेत की, मी कमला हॅरिस, अध्यक्षपदासाठी तुमची डेमोक्रॅटिक उमेदवार आहे. कारण जो बायडन यांच्या निरुपयोगी विधानांमुळे त्यांचे वृद्धत्व उघड झाले आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानते. विविधतेच्या बाबतीत मी अव्वल असल्याने माझी निवड झाली. जर तुम्ही माझ्या बोलण्यावर टीका करत असाल तर तुम्ही लैंगिकतावादी आणि वर्णद्वेषी आहात. मला कदाचित देश चालवण्याबद्दल काही माहित नसेल पण लक्षात ठेवा, जर तुम्ही डीप स्टेट कठपुतळी असाल तर ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्षे जो बायडनच्या संरक्षणाखाली डीप स्टेट कठपुतळी म्हणून घालवली आहेत.
Musk ने शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर त्याच्यावर आता मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. Musk ने कमला हॅरिसचा हा डीपफेक व्हिडिओ डिस्क्लेमरसह पोस्ट केला तेव्हा युजर्सनी Musk वर डीपफेकचा प्रचार केल्याचा आरोप केला. कमला हॅरिसच्या प्रवक्त्या मिया एहरनबर्ग यांनी सांगितलं की, “आमचा विश्वास आहे की अमेरिकन लोकांना खरे स्वातंत्र्य, संधी आणि सुरक्षा हवी आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असलेला हा व्हिडिओ AI कडून राजकारणात खिल्ली उडवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी वापरला जात आहे.