फोटो सौजन्य -iStock
कोरोना लॉकडाऊननंतर जग मोठ्या प्रमाणात बदललं आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मिटींग, व्हर्च्युअल क्लासेस यासांरख्या गोष्टी सध्या सर्वत्र सुरु आहेत. हल्ली लोकं एकमेकांना फेस टू फेस कमी आणि ऑनलाईनच जास्त भेटतात. व्हिडीओ कॉलींगव्दारे व्हर्च्युअली एकमेकांची भेट घेतली जाते, व्हर्च्युअल क्लासेस घेतले जातात तसेच अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देतात, या सगळ्यामुळे लोकांच्या प्रवासाचा वेळ वाचतो आणि ऑनलाईन पध्दतीने अनेक कामं देखील होतात. पण ही सगळी काम आपण लॅपटॉपच्या साहाय्याने करतो आणि यासाठी आपल्या लॅपटॉपचा कॅमेरा चांगला असणं खूप महत्त्वाचा आहे. आज आम्ही तुम्हाला अश्या काही टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्याची क्वालिटी सुधारू शकता.
कॅमेरा लेन्स साफ करणे
सर्वात आधी, एका मायक्रोफायबर कापडाने तुमच्या लॅपटॉपची कॅमेरा लेन्स स्वच्छ करा. लेन्सवरील धूळ किंवा बोटांचे ठसे अनेकदा कॅमेऱ्याची गुणवत्ता खराब करतात. ज्यामुळे व्हीडीओ कॉलींग किंवा ऑनलाईन मिटींगवर याचा परिणाम होतो. मायक्रोफायबर कापडाने तुमच्या लॅपटॉपची कॅमेरा लेन्स स्वच्छ केल्याने तुमच्या लॅपटॉपची कॅमेरा क्वालिटी सुधारण्यासाठी मदत होईल.
हेदेखील वाचा- OnePlus Nord 4 vs OnePlus Nord 3: Nord 4 की Nord 3 कोणता फोन देईल पैसै वसूल फीचर्स?
लॅपटॉप ब्राईटनेस सुधारा
तुमच्या चेहऱ्यासमोर नेहमी प्रकाश ठेवा, ज्यामुळे व्हीडीओ कॉलींग किंवा ऑनलाईन मिटींग दरम्यान समोरच्या व्यक्तिला तुमचा चेहरा व्यवस्थित दिसेल. शक्य असल्यास नैसर्गिक प्रकाश किंवा रिंग लाइटचा वापर करा.
कॅमेरा सेटिंग्ज अॅडजस्ट करा
हल्ली बाजारात नवीन तंत्रज्ञानासह अनेक लॅपटॉप उपलब्ध आहेत. या लॅपटॉपमध्ये कॅमेरा सेटिंग्ज अॅडजस्ट करण्याचा पर्याय देण्यात येतो. तुमच्या लॅपटॉपमधील ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि एक्सपोजर सेटिंग्ज तपासा आणि त्यांना योग्यरित्या सेट करा.
सॉफ्टवेअर अपडेट करा
तुमचे कॅमेरा ड्रायव्हर्स आणि व्हिडिओ कॉलिंग ॲप्लिकेशन्स (उदा. झूम, स्काईप) या अॅप्सचे नवीन व्हर्जन डाऊनलोड करा. काहीवेळा सॉफ्टवेअर अद्यतने कॅमेरा गुणवत्ता सुधारू शकतात.
बॅकग्राऊंड स्पष्ट ठेवा
स्वच्छ आणि साधे बॅकग्राऊंड तुमच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे व्हिडिओ कॉलची गुणवत्ता सुधारते.
हेदेखील वाचा- ऑनलाईन स्कॅमचा धोका टाळण्यासाठी Apple कडून युजर्ससाठी काही टीप्स जारी
वेबकॅम कव्हर वापरा
तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर अनेकदा धूळ साचत असल्यास, वेबकॅम कव्हर वापरा. तुम्ही कॅमेरा वापरत नसताना तो झाकून ठेवा.
लॅपटॉपच्या कॅमेऱ्यासोबतच लॅपॉपचा किबोर्ड देखील आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असतो. सततच्या वापरामुळे त्यामध्ये धूळ, घाण आणि बॅक्टेरिया जमा होऊ शकतात, ज्यामुळे कीबोर्डची कार्यक्षमता आणि स्वच्छतेवर परिणाम होतो. कीबोर्ड स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही पुढील टीप्स फॉलो करू शकता.
कीबोर्ड साफ करा
लॅपटॉप बंद करा, बॅटरी काढून टाका आणि कीबोर्ड साफ करा. कीबोर्ड साफ करण्यापूर्वी, लॅपटॉप बंद आहे याची खात्री करा आणि कोणतेही विद्युत नुकसान टाळण्यासाठी बॅटरी काढून टाका. कीबोर्ड बटणांखाली अडकलेली धूळ आणि घाण दूर करण्यासाठी लॅपटॉप हलकाच उलटा करा.
मऊ ब्रश वापरा
कीबोर्डच्या बटणांमधली आणि आजूबाजूची धूळ आणि घाण साफ करण्यासाठी मऊ ब्रश किंवा पेंटब्रश वापरा.
मायक्रोफायबर कापड आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोल
मायक्रोफायबर कापड सौम्य आयसोप्रोपाइल अल्कोहोलने ओलसर करा आणि कीबोर्ड बटणे हळूवारपणे पुसून टाका. कापड जास्त ओले नसावे हे लक्षात ठेवा.