IRCTC वेबसाइट सोडा, हे ॲप्स आहेतट्रेन तिकीट बुकिंगसाठी सर्वोत्तम! सर्वात स्वस्त दरात मिळेल कन्फर्म तिकीट
भारतातील रेल्वे प्रवास हा बहुतेक प्रवाशांसाठी सर्वात पसंतीचा आणि सुलभ प्रवासाचा पर्याय आहे. बहुतेक लोक आपल्या रोजच्या जीवनात ट्रेनने प्रवास करतात. अशा परिस्थितीत तिकीट बुकिंगसाठी सोपे आणि विश्वासार्ह ॲप असणे आवश्यक आहे. आजकाल सर्व गोष्टी ऑनलाईन होत चालल्या आहेत अशात ट्रेन तिकीट देखील आता ऑनलाईन बुक करणे शक्य झाले आहे. तुमचा प्रवास जलद, सोयीस्कर आणि तणावमुक्त बनवणारी काही सर्वोत्तम ट्रेन तिकीट बुकिंग ॲप्स येथे आहेत. जलद आणि सोप्या प्रक्रियेमुळे, तुमचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता देखील लक्षणीय वाढते. त्याच वेळी, ॲप्सवर उपलब्ध असलेल्या विशेष ऑफर देखील किंमत कमी करण्यास मदत करू शकतात.
IRCTC रेल कनेक्ट ॲप
अधिकृत IRCTC Rail Connect ॲप हे भारतीय रेल्वेचे अधिकृत ॲप आहे. यामध्ये तुम्ही इन्स्टंट बुकिंग, कन्फर्मेशन स्टेटस चेक, सीट सिलेक्शन, ट्रेन शेड्यूल आणि पीएनआर स्टेटस यासारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. हे वापरण्यास फार सोपे आहे आणि यात उच्च पातळीची सुरक्षा देण्यात आली आहे.
टेक संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Paytm
ऑनलाइन पेमेंट आणि बुकिंगसाठी तुम्ही प्रसिद्ध पेटीएम ॲपद्वारे ट्रेनची तिकिटे देखील बुक करू शकता. यामध्ये कॅशबॅक ऑफर आणि कन्फर्मेशन प्रेडिक्शन सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच, तुम्ही थेट वॉलेटमधून पेमेंट करून प्रक्रिया आणखीन जलद जलद करू शकता.
ConfirmTkt
कन्फर्म टीकेटी ॲपमध्ये कन्फर्मेशन प्रेडिक्शन आणि सुलभ कन्फर्म तिकीट फीचर्स आहेत. तुमचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असल्यास, हे ॲप तुम्हाला तुमचे तिकीट कन्फर्म होण्याच्या संभाव्यतेचा अंदाज लावण्यात मदत करते. याशिवाय तुम्ही त्यावर तत्काळ तिकीटही बुक करू शकता.
MakeMyTrip
मेक माय ट्रिप ॲप ट्रेन, फ्लाइट, बस आणि हॉटेल बुकिंग सर्व एकाच प्लॅटफॉर्मवर देते. यामध्ये तुम्हाला एक्सक्लुझिव्ह ऑफर्स आणि डिस्काउंट देखील मिळतात. याशिवाय, यात प्रवास विम्याची सुविधा देखील आहे, ज्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होतो.
टेक संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Goibibo
गोआयबीबो हे ट्रेन तिकीट बुकिंगसाठी देखील लोकप्रिय ॲप आहे. यामध्ये तुम्ही ट्रेन शेड्यूल, पीएनआर स्टेटस चेक आणि कन्फर्मेशन प्रेडिक्शन यांसारख्या फीचर्सचा लाभ घेऊ शकता. ॲपवर विविध ऑफर आणि कॅशबॅक देखील उपलब्ध आहेत ज्यामुळे तुमची बुकिंग स्वस्त होते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या यादीत या ॲपचा समावेश करू शकता.