जुनं ते सोनं! घरातील जुन्या वस्तूंपासून कमवता येतील पैसे, फक्त हे ॲप्स डाउनलोड करा
आजच्या युगात प्रत्येकाला दररोज काहीतरी नवीन हवे असते. बदलत्या ट्रेंडनुसार लोक नवनवीन गोष्टी घेऊ बघतात आणि जुन्या वस्तूंना अडगळीच्या खोलीत किंवा घराच्या एका कोपऱ्यात टाकून देतात. यामुळे घर अस्वछ तर होतेच आणि घरात आणखीन पसारा दिसू लागतो. शिवाय या जुन्या सामानाला हळूहळू धूळ लागते. या सर्व बाबींमुळे काहीवेळाने आपल्याला हे सामान नकोसे वाटू लागते मात्र याचे काय करावे ते सुचत नाही. बऱ्याचदा यातील अनेक सामान चांगले असल्याने आपल्याला यांना फेकणे फार जाड जाते.
तुमच्याही घरात असा कामाच्या पण नकोश्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत? मग आता चिंता करू नका, कारण या गोष्टींपासून तुम्ही बक्कळ पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला अधिक काहीही करायची गरज नाही. यासाठी तुम्हाला घरबसल्या फक्त काही मोबाइल ॲप्स डाउनलोड करावे लागतील. या ॲप्सवर तुम्ही तुमचे जुने सामान विकून त्यापासून पैसे कमवू शकता.
हेदेखील वाचा – BJP’ने लाँच केला सदस्यता अभियान, फक्त एका मिस कॉलने मिळणार मेंबरशिप, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता. यानंतर तुम्ही Free up ॲपवर घरगुती फर्निचर, कूलर, एअर कंडिशनरसह जुने कपडे, कॉस्मेटिकअशा अनेक वस्तूंची विक्री करता येते. या Free up ॲपवर काही वस्तू चांगल्या किमतीत विकल्या जाऊ शकतात. तसेच इथून तुम्ही काही नवीन गोष्टीदेखील खरेदी करू शकता. अशा पद्धतीने जर तुमच्या घरात जुन्या वस्तू जास्त जमा झाल्या असतील तर तुम्ही या वस्तू Free up ॲपवर विकू शकतात.
जुने सामान विकण्यासाठीचे दुसरे ॲप आहे Scrap Door ॲप. या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ जुन्या वस्तूंची विक्री करू शकत नाही. यासोबतच मोबाइल रिचार्ज, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि सिलिंडरही बुक करू शकता. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून स्क्रॅप डोअर ॲप डाऊनलोड करू शकता आणि याचा फायदा घेऊ शकतात. जुन्या वस्तू विकण्यासाठीचा हा एक उत्तम मार्ग आहे.
हेदेखील वाचा – Google Pay UPI Circle: आता बँक खात्याशिवाय करू शकता ऑनलाईन पेमेंट! कसे ते जाणून घ्या
ऑनलाईन ॲपवर तुम्ही जुन्या वस्तूंची विक्री किंवा खरेदी करत असाल तर आधी तुम्ही स्वत: देखील वस्तू तपासून पाहावी. तसेच जोपर्यंत आपल्याकडे मालाचे पूर्ण पैसे येत नाहीत. त्याचप्रमाणे या ॲप्सवर फक्त असेच सामान विकले जाते जे चांगल्या स्थितीत आहेत. तुमचे फाटलेला कपडे, मोडके सामान तुम्ही या प्लॅटफॉर्म्सवर नाही विकू शकत. तोपर्यंत आपण खबरदारी घ्यावी. तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ऑनलाईन ॲपवर वस्तू विकण्याचा त्रास होणार नाही.