फेसबूक वापर वापरकर्त्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट येमार आहे. या अपडेटनुसार तुमच्या फेसबूक प्रोफाइलमध्ये मोठे बदल बघायला मिळणार आहे. हा नवा अपडेट 1 डिसेंबरपासून अप्लाय होणार असुन या अपडेनुसार फेसबूकच्या प्रोफाईलवरुन काही महत्वपूर्ण गोष्टी हटवण्यात येणार आहे.तरी फेसबूकडून हा नवा अपडेट का लॉंच करण्यात आला या मागचा उद्देश अजून तरी स्पष्ट झालेला नाही. तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर , धार्मिक विचार , पत्ते आणि राजकीय विचार यासारख्या गोष्टी दिसणार नाहीत.
सध्या तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर तुमची शाळा , कॉलेज , नोकरीचं ठिकाण, तुमच मुळगाव, तुम्ही हल्ली कुठल्या शहरात असता, मोबाईल नंबर, ईमेल अडरेस, लिंग, जन्मतारीख, इन्टरेंस्टेड इन, रिलेशनशीप स्टेटस यासारख्या गोष्टी अड कराव्या लागतात. किंबहुना त्यातील कुठल्या गोष्टी पब्लिक ठेवायच्या कुठल्या गोष्टी फ्रेन्डस तर कुठल्या गोष्टी प्रायवेट याबाब तुम्ही ठरवू शकता. त्याप्रकारची सेटींग करण्याची तुम्हाला मुभा असते पण यांत आता खुद्द फएसबूक कडूनचं मोठे बदल करण्यात आले आहेत.
पण सोशल मीडिया कन्सल्टंट मॅट नवरा यांनी याबाबत ट्विट करत या बदलांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. यांत त्यांनी फेसबूक इंटरेस्टेड इन आणि रिलेजीअस व्हूव्ह 1 डिसेंबर पासून काढून टाकणार असल्याची माहिती दिली आहे.
Facebook is removing religious views and ‘interested in’ info from profiles from 1 December 2022 pic.twitter.com/SKjSrtwUwm — Matt Navarra (@MattNavarra) November 16, 2022