घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कन्फर्म रेल्वे तिकीट पाहिजे? 'या' टीप्स फॉलो करा (फोटो सौजन्य - pinterest)
जे लोक त्यांच्या घरापासून दूर राहतात त्यांना वर्षातून फक्त काही वेळा घरी जाण्याची संधी मिळते. पण अशा परिस्थितीत घरी जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेचं कन्फर्म तिकीट. घरापासून दूर राहणाऱ्यांना घरी जाण्यासाठी सुट्टी मिळाली तरी त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना घरी जाण्यासाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट.
हेदेखील वाचा-HMD Skyline स्मार्टफोन भारतात झाला लाँच! बिघडलेला फोन स्वत: करू शकाल दुरुस्त, आज होणार पहिली विक्री
सणासुदीच्या काळात किंवा इतर कोणत्याही विशेष प्रसंगी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणं सर्वात अवघड गोष्ट आहे. अशा परिस्थीतीत तुम्हाला रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी एजंटला जास्तीचे पैसे द्यावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरी जाण्यासाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळवू शकता.
तिकिटांच्या गर्दीत, जर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय रेल्वेचे कन्फर्म तिकीट हवं असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला रेल्वेचं कन्फर्म तिकीट कोण मिळवून देऊ शकेल. प्रवासाला सोयीस्कर बनवण्यासाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी नवनवीन वैशिष्ट्ये देत असते. 2015 मध्ये रेल्वेने ‘विकल्प पर्याय’ योजना सुरू केली होती. यामध्ये, प्रवाशाला एकाच वेळी दोन किंवा अधिक गाड्या निवडण्याचा पर्याय मिळतो. एक प्रवासी जास्तीत जास्त 7 ट्रेन निवडू शकतो. जास्तीत जास्त ट्रेन निडल्यामुळे तुम्हाला रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी अधिक वाढते.
हेदेखील वाचा- UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय, असा होणार फायदा
ऑनलाइन वेटिंग तिकीट बुक करताना तुम्ही दोन किंवा अधिक ट्रेन निवडल्यास, तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये 7 गाड्या प्राधान्याने ठेवता येतील. असे केल्याने रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी अधिक वाढते. रेल्वेने देऊ केलेल्या या योजनेला पर्यायी ट्रेन निवास योजना (ATAS) म्हणतात. या योजनेची चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक लोक याचा वापर करून कन्फर्म तिकिटे मिळवतात. या माध्यमातून प्रत्येकाला तिकीट देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. यामध्ये तुमचे तिकीट एका मार्गावरील इतर ट्रेनमध्ये ट्रान्सफर केले जाते.