vivo V40 आणि V40 Pro आज भारतात होणार लाँच (फोटो सौजन्य-vivo)
सर्वांची आवडती टेक कंपनी Vivo ने आज भारतात त्यांची बहुप्रतिक्षित सिरीज Vivo V40 लाँच करणार आहेत. Vivo V40 सिरीजमध्ये 2 फोन लाँच केले जाणार आहेत. ज्यामध्ये Vivo V40 आणि V40 Pro यांचा समावेश आहे. दोन्ही फोन जबरदस्त कॅमेरा आणि तगड्या फीचर्ससह लाँच केले जाणार आहेत. भारतातील Vivo युजर्समध्ये गेल्या अनेक दिवसांपासून Vivo V40 सिरीजची चर्चा सुरु होती. Vivo V40 सिरीजबाबत भारतातील युजर्स अतिशय उत्सुक होते. आता अखेर ही सिरीज आज भारतात धमाकेदार एंट्री करणार आहे.
हेदेखील वाचा- Microsoft साठी ग्लोबल आउटेजमधून सावरणं झालं कठीण; कंपनीने डेल्टावर केले आरोप
कंपनीने ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर Vivo V40 आणि V40 Pro फोन्सचे लँडिंग पेज जारी केले आहे. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे अशा लोकांसाठी Vivo V40 सिरीज अतिशय फायदेशीर ठरणार आहे, कारण कंपनीने या सिरीजमधील फोनच्या कॅमेऱ्यावर विशेष लक्ष दिलं आहे. कंपनीने दावा केला आहे की, Vivo V40 सिरीजमधील फोन्सच्या मदतीने प्रोफेशनल ग्रेड आर्टिस्टिक पोर्ट्रेट क्लिक केले जाऊ शकते. Vivo V40 सिरीजमधील फोन ZEISS च्या अपग्रेडेड कॉलेबरेशनसह लाँच केला जात आहे. युजर्स आज कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून तसेच ई कॉमर्स वेबसाईट असलेल्या फ्लिपकार्ट आणि त्यांच्या जवळच्या रिटेल स्टोअर्समधून Vivo V40 आणि V40 Pro ची खरेदी करू शकतात. तुम्ही कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर Vivo V40 सिरीजचे लाँचिंग पाहू शकता.
Vivo V40 आणि V40 Pro मध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 120 Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोनचे डिझाईन अतिशय स्लिम आहे. त्यामुळे अगदी कोणीही सहज या फोनकडे आकर्षित होईल. युजर्स नक्कीच डिझाईन पाहून Vivo V40 सिरीजच्या प्रेमात पडतील. Vivo V40 सिरीज IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स आहे. त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून तुमच्या फोनचं संरक्षण केलं जातं.
हेदेखील वाचा- माझे वडील क्रूर, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही; ट्रान्सजेंडर मुलीचा Elon Musk वर पुन्हा गंभीर आरोप
Vivo V40 आणि V40 Pro मध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. V40 स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 3 सह लाँच केला जात आहे. तर V40 Pro मध्ये मीडियाटेक डायमेंशन 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे. Vivo V40 सिरीजमधील Vivo V40 आणि V40 Pro स्मार्टफोन्स प्रिमियम डिझाईनसह लाँच केले जात आहे. तुम्ही हे फोन Lotus Purple, Ganges Blue आणि Titanium Grey या रंगांमध्ये खरेदी करू शकता.
V40 सिरीजमध्ये ग्राहकांना मजबूत कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोन 50MP ZEISS अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरासह 119 डिग्री वाइड अँगल शॉट्स घेण्याच्या सुविधेसह लाँच केला जाणार आहे. हा फोन 50MP ZEISS OIS मेन कॅमेरा सह आणला जात आहे. Vivo फोनचा मुख्य कॅमेरा Sony IMX921 सेन्सरने सुसज्ज असेल. याशिवाय, फोनमध्ये 50MP ZEISS टेलीफोटो पोर्ट्रेट कॅमेरा Sony IMX816 सेंसर असेल. कंपनीचे म्हणणे आहे की फोनच्या पोर्ट्रेट कॅमेऱ्यातून 50x ZEISS हायपर झूम फोटो क्लिक केले जाऊ शकतात. याशिवाय, फोनचा सेन्सर सुपर क्लॅरिटी आणि तपशीलवार प्रतिमा क्लिक करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
Vivo V40 ची किंमत 39,999 रुपये आहे. ग्राहक ई कॉमर्स वेबसाईट असलेल्या फ्लिपकार्टवरून 6,667 रुपयांच्या 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर देखील या फोनची खरेदी करू शकतात.