Microsoft साठी ग्लोबल आउटेजमधून सावरणं झालं कठीण (फोटो सौजन्य - pinterest)
कोणताही मायक्रोसॉफ्ट युजर 19 जुलैचा दिवस कधीही विसरणार नाही. या दिवशी कंपनीला सर्वात मोठ्या आउटेजचा सामना करावा लागला होता. ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला होता. जगभरातील अनेक कामं ठप्प झाली होती. विमान कंपन्या, दवाखाने, कॉर्पोरेट ऑफीस, अशा अनेक ठिाकाणांची कामं ठप्प झाली होती. मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम रेल्वे नेटवर्कवर देखील झाला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, CrowdStrike ने एक अपडेट जारी केलं आणि या अपडेटमुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला. यावेळी सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्ट डाऊनचा संपूर्ण दोष CrowdStrike ला दिला होता.
हेदेखील वाचा- Microsoft युजर्सवर पुन्हा एकदा CrowdStrike अटॅक होण्याची शक्यता; कंपनीकडून अलर्ट जारी
या घटनेला 15 ते 20 दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप मायक्रोसॉफ्ट आउटेजचा सामना करत आहे. मायक्रोसॉफ्टला या आउटेजमधून सावरण्यसाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे. या सर्व समस्येसाठी आत मायक्रोसॉफ्टने डेल्टाला दोष दिला आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितलं की, डेल्टा एअर लाइन्समुळे जागतिक सायबर आउटेजमधून सावरण्यसाठी कंपनीला मोठा संघर्ष करावा लागत आहे.
गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टला मोठ्या प्रमाणात आउटेजचा सामना करावा लागला. कारण सायबर सुरक्षा फर्म CrowdStrike द्वारे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले होते, ज्यामुळे मायक्रोसॉफ्ट ग्राहकांना अनेक एअरलाइन्ससह सिस्टम समस्या उद्भवल्या. इतर प्रमुख यूएस वाहकांमधील व्यत्यय दुसऱ्या दिवशी कमी झाला. कारण या कंपन्यांनी त्यांच्या आयटी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केलेले आहे. मात्र डेल्टाने त्याच्या प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे त्याच्या आयटी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केलेले नाही. परिणामी कंपनीची 6,000 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. याचा फटका मायक्रोसॉफ्टला बसला.
हेदेखील वाचा- चीनमध्ये Microsoft कर्मचाऱ्यांना Android स्मार्टफोन वापरण्यास बंदी! iPhone वापरण्याचे कंपनीचे आदेश
कंपनीशी संबंधित एका व्यक्तीने सांगितलं की, डेल्टाकडे आमच्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रगत सेवेमध्ये गुंतवणूक करण्याचा मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे. अशा परिस्थितीत, उड्डाण विस्कळीत झाल्यामुळे लाखो प्रवासी अडकून पडले आणि अटलांटा-आधारित विमान कंपनीला 500 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
19 जुलै रोजी मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि संगणक ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले. MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप 19 जुलै रोजी अचानक क्रॅश झाले. यावेळी युजर्सना त्यांच्या स्क्रिनवर केवळ एक निळ्या रंगाची स्क्रीन दिसत होती. याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला होता. मायक्रोसॉफ्ट डाऊनमुळे डिगो एअरलाइन्सची सुमारे 200 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. सर्व्हरच्या बिघाडामुळे बँकांची कामं देखील ठप्प झाली होती. मायक्रोसॉफ्ट डाऊनमुळे स्काय न्यूज चॅनल ब्रिटनमध्ये बंद झाले होते. मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम ब्रिटनमध्ये देखील झाला होता. ब्रिटनमधील स्काय न्यूज चॅनेल बंद झालं होतं. जगभरातील अनेक कंपन्या केवळ Microsoft सिस्टमवर अवलंबून आहेत. त्यामुळे 19 जुलै रोजी जेव्हा अचानक Microsoft सिस्टम क्रॅश झाली होती, तेव्हा या कंपन्यांकडे कोणताही इतर पर्याय नसल्यामुळे या कंपन्यांची कामं ठप्प झाली होती.