मोबाईल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार! ग्राहकांना महागाईचा फटका कधी बसणार? जाणून घ्या
मागेच देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्जचे प्लॅन महाग केले. त्यांनतर आता वोडाफोन आयडियाच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती पुन्हा महाग होण्याची अपेक्षा केली जात आहे. व्हीचे (Vi) मुख्य कार्यकारी अक्षय मुंद्रा म्हणाले की, टेरिफ प्लॅन पुढील 15 महिन्यांत टेलिकॉम क्षेत्रासाठी पुन्हा महाग होऊ शकते. असे झाल्यास Jio, Airtel आणि Vodafone-Idea चे मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग होऊ शकतात.
2025 च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत दर पुन्हा वाढतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. हे घडण्यामागील कारण टेलिकॉम सेक्टर ऑपरेटरमधील कॅश फ्लोला चालना देणे हे असल्याचे मानले जाते. अक्षय मुंद्रा यांनी सांगितले की, कंपनीने जुलैमध्ये टॅरिफ प्लानमध्ये वाढ केली होती. तसेच, पुढील 15 महिन्यांनंतर पुन्हा किंमत वाढविण्याचा विचार केला जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा – OnePlus 12R, OnePlus Nord 4 आणि इतर OnePlus डिव्हाइसवर सुरु आहे जबरदस्त ऑफर्स! खरेदीची संधी चुकवू नका
जुलैमध्ये, देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमतींमध्ये वाढ केली. रिलायन्स जिओने 12% ते 25% पर्यंत दर वाढवले. जिओ नंतर लगेचच, Bharti Airtel ने 11% वरून 21% पर्यंत टॅरिफ वाढवले होते. या दोन कंपन्यांच्या एका दिवसानंतर, 4 जुलै 2024 रोजी, Vi ने मोबाईल टॅरिफमध्ये 10-23% वाढ केली. महागड्या रिचार्ज प्लॅन्समुळे ग्राहकांनी जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियापासून स्वतःला दूर केले आहे. तसेच बीएसएनएलकडे पर्याय म्हणून पाहत आहे.
हेदेखील वाचा – Jio Airtel Vi’चा गर्व धुळीत मिळवला, नेटवर्क सोडण्याचा नवा विक्रम, BSNL’ची फुल मजा
Vi ने Samsung, Nokia आणि Ericsson सोबत एक मोठा करार केला आहे, ज्या अंतर्गत पुढील तीन वर्षात 4G नेटवर्कचा विस्तार केला जाईल. तसेच, 5G नेटवर्क आणले जाईल. मूंदड़ा म्हणाले की, 4G आणि 5G उपकरणांची डिलिव्हरी लवकरच सुरू होईल. त्यांनी सांगितले की व्होडाफोन-आयडियाला 17 सर्कलमध्ये 5G स्पेक्ट्रम मिळाले आहे. अशा परिस्थितीत, VI सर्व सर्कल्समध्ये लवकरच 5G लाँच करेल. त्यांनी पुढे सांगितले की, 5G चा विकास अतिशय वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही भारताच्या 5G मार्केटवर लक्ष ठेवून आहोत. आवश्यक असल्यास, वोडाफोन आयडिया 5G नेटवर्क रोलआउटला गती दिली जाईल.