OnePlus 12R, OnePlus Nord 4 आणि इतर OnePlus डिव्हाइसवर सुरु आहे जबरदस्त ऑफर्स! खरेदीची संधी चुकवू नका
सणासुदीचा काळ हा आनंदाचा आणि भेटवस्तूंचा काळ असतो. सण आले की आपण आपल्या भावाबहिणींना नातेवाईकांना काही ना काही गिफ्ट देतच असतो. पण या काळात दरवर्षी तुमच्या मनात एकच प्रश्न असतो, आणि हा प्रश्न म्हणजे यंदा कोणतं नवीन गिफ्ट द्यायचं? यंदा तुम्ही तुमच्या भावा बहिणींना OnePlus चे काही प्रॉडक्ट्स गिफ्ट करू शकतो. काही असे गॅजेट्स जे रोजच्या जीवनात वापरले जाऊ शकतात.
हेदेखील वाचा- Huawei Mate XT: जगातील पहिला ट्राय फोल्ड फोन लाँच, किंमत वाचून धक्का बसेल
एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे गॅजेट्स आता तुम्ही ऑफर्समध्ये खरेदी शकता. सणासुदीच्या या काळात OnePlus ने त्यांच्या प्रॉडक्ट्सवर फेस्टिव ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर OnePlus.in, Amazon.in, OnePlus Experience Stores आणि ऑफलाइन पार्टनर स्टोअर्सवर उपलब्ध आहे. या सेलमध्ये तुम्ही OnePlus 12R, OnePlus Nord 4 आणि इतर OnePlus डिव्हाइसची कमी किंमतीत खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
OnePlus च्या लोकप्रिय स्मार्टफनमधील एक म्हणजे OnePlus 12 सिरीज. पॉवरफुल प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरा सिस्टीम, आकर्षक डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग या सर्व फिचर्सने सुसज्ज असलेली OnePlus 12 सिरीज तुम्ही आकर्षक ऑफरमध्ये खरेदी करू शकता. 26 सप्टेंबरपासून ग्राहकांना OnePlus 12 सिरीजवर मजेदार डिल्स मिळणार आहेत. OnePlus 12R खरेदी करणारे ग्राहक 26 सप्टेंबरपासून निवडक बँक कार्डांवर 3,000 रुपयांपर्यंतची बँक सवलत आणि 6 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI घेऊ शकतात.
26 ते 28 सप्टेंबरपर्यंत, वापरकर्ते 8+256GB आणि 16+256GB व्हेरियंटवर 5,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतात. 29 सप्टेंबरपासून, ग्राहकांना 8+256GB व्हेरियंटवर 5,000 रुपयांचे आणि 16+256GB व्हेरिएंटवर 3,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. Red केबल क्लबचे सदस्य OnePlus.in वरून 8+256GB व्हेरिएंटच्या खरेदीवर 2000 रुपयांचे डिस्काऊंट देणार आहे. 26 सप्टेंबरपासून ग्राहकांना OnePlus 12 सिरीजच्या खरेदीवर OnePlus Buds Pro 2 गिफ्ट म्हणून मिळणार आहे. याव्यतिरिक्त, 7,000 रुपयांपर्यंतची सूट, 6 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI आणि 2,000 रुपयांचे विशेष कूपन निवडक बँक कार्डांवर देखील उपलब्ध आहेत.
हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Festival Sale: फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स
तुम्ही मिड-रेंजमध्ये चांगला स्मार्टफोन शोधत असाल, तर OnePlus Nord सीरिजचा नक्कीच विचार करा. ही मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रिय आहे. नुकताच लाँच केलेला OnePlus Nord 4 हा एक उत्तम स्मार्टफोन आहे. यात Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर, 5,500mAh बॅटरी, 100W SUPERVOOC तंत्रज्ञान आणि 256GB स्टोरेज यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. 26 सप्टेंबरपासून ग्राहक OnePlus Nord 4 खरेदीवर निवडक बँक कार्ड्सवर 2,000 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळवू शकतात.
तुम्हाला 8+128GB / 12+256GB व्हेरियंटवर 2000 रुपयांचे आणि 8+256GB व्हेरियंटवर 3000 रुपयांचे विशेष कूपन देखील ग्राहकांना मिळणार आहे. विद्यार्थी OnePlus Nord 4 वर OnePlus Nord Buds 3 Pro, OnePlus Nord Buds 3, OnePlus Nord Buds 2 आणि OnePlus Nord Buds 2R सोबत 1000 रुपयांची सूट मिळवू शकतात. OnePlus Nord CE4 वर 1,500 रुपयांपर्यंतचे इन्स्टंट डिस्काउंट आणि 3 महिन्यांच्या विना-किंमत EMI उपलब्ध आहे.
OnePlus Pad 2 वर 3,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट आणि 9 महिन्यांच्या विना-किंमत EMI सह एक्सचेंज ऑफरमध्ये 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. OnePlus Watch 2 वर 3,000 रुपयांचे बँक डिस्काऊंट मिळणार आहे. OnePlus Buds 3 वर Rs 500 ची सूट मिळणार आहे. OnePlus Nord Buds 3 आणि Pro वर अनुक्रमे 200 आणि 300 रुपयांची सूट मिळेल. रेड केबल क्लब आणि विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त सवलती देखील उपलब्ध आहेत.