फोटो सौजन्य -iStock
आपण वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती शोधण्यासाठी Google Chrome चा वापर करतो. कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा एखाद्या विषयावरील माहिती जाणून घेण्यासाठी Google Chrome ची मदत घेणं फायदेशीर ठरतं. पण आपण Google Chrome ज्या काही गोष्टी सर्च करतो त्या सगळ्या सर्च हिस्ट्रीमध्ये साठवल्या जातात. आपण सहज Google Chrome ओपन केलं तर त्यामध्ये आपल्याला आपण यापूर्वी सर्च केलेल्या सर्व गोष्टी दिसतील. त्याचप्रमाणे आपण YouTube वर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बघतो. आपल्याला एखादा व्हिडीओ आवडला कि तो आपण वारंवार सर्च करतो. पण तुम्ही YouTube वर ज्या काही गोष्टी सर्च करता आणि जे कोणते व्हिडीओ बघता ते सर्व तुमच्या वॉच हिस्ट्रीमध्ये जमा होतात. आपण YouTube ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च केलेल्या सर्व गोष्टींची नावं स्क्रिनवर दिसतात.
आपण आपला फोन कोणाकडे दिला तर तो आपली Google Chrome ची सर्च हिस्ट्री किंवा YouTube वरील वॉच हिस्ट्री तर बघणार नाही ना, अशी भिती काहींच्या मनात असते. पण आता तुम्हाला टेंशन घेण्याची काहीच गरज नाही. तुम्ही अगदी काही क्षणातच आणि सोप्या पध्दतीने Google Chrome ची सर्च हिस्ट्री आणि YouTube वरील वॉच हिस्ट्री डिलीट करू शकता. त्यामुळे कोणीही तुमचा फोन घेतला तरी आता तुम्हाला टेंशन घेण्याची काहीच गरज नाही.