फोटो सौजन्य - सोशल मिडीया
देशातील 3 प्रमुख खाजगी दूरसंचार कंपन्या JIO, Airtel आणि VI यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतींमध्ये वाढ केली. कंपन्यांचे हे नवे दर 3 जुलैपासून देशात लागू करण्यात आले. JIO, Airtel आणि VI या कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर त्यांच्या युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. कंपन्यांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक युजर्स BSNL कडे वळले. JIO, Airtel आणि VI या कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांची BSNL ला पंसती मिळाली.
BSNL च्या सिमकार्ड विक्रीत सुमारे 3 पटीने वाढ झाली आहे. लाखो युजर्सनी त्यांचे सिम BSNL मध्ये पोर्ट केलं आहे. तुम्हाला देखील तुमचा JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचं आहे का? यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमचं JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करू शकता.
सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करण्याची प्रोसेस JIO किंवा Airtel युजर्सासाठी समान आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नवीन नियमांनुसार,आता तुम्हाला कोणताही नंबर दुसऱ्या कंपनीच्या नंबरवर पोर्ट करण्यासाठी 7 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
JIO, Airtel आणि VI या कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर त्यांच्या युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. कंपन्यांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक युजर्स BSNL कडे वळले. JIO, Airtel आणि VI या कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांची BSNL ला पंसती मिळाली. X वर #BSNL_ki_Ghar_Wapsi हा ट्रेंड देखील व्हायरल होत आहे. यासोबतच JIO च्या नाराज युजर्सनी X वर #BoycottJio ट्रेंड केला आहे. खासगी कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महाग झाल्यानंतर BSNL ला अच्छे दिन आले आहेत. लोकांमध्ये BSNL ची क्रेझ वाढत आहे. BSNL सिमची विक्री 3 पटीने वाढली आहे. BSNL मधील पोर्टेबिलिटीही अडीच पटीने वाढली आहे.