फोटो सौजन्य - pinterest
सध्याच्या डिजीटल जगात आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे AI. ChatGPT हे सर्वात पहिलं AI चॅटबोट आहे. ChatGPT लाँच केल्यानंतर जगात AI ची क्रेझ प्रचंड वाढली. त्यामुळे प्रत्येकजण छोट्या छोट्या कामांसाठी ChatGPT चा वापर करत आहे. कॉलेज आणि शाळेचे विद्यार्थी असाईंनमेंट पूर्ण करण्यासाठी ChatGPT चा वापर करतात. तर अनेकजण त्यांच्या पर्सनल कामांसाठी देखील ChatGPT चा वापर करतात. कामावर जाणारे लोकं देखील त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी, प्रझेंटेशन तयार करण्यासाठी ChatGPT चा वापर करतात. ChatGPT मुळे आपल्याला अचूक आणि फायदेशीर मजकूर मिळतो.
हेदेखील वाचा- Portable Clothes Dryer: आता पावसाळ्यात कपडे सुकवण्याचं टेंशन मिटलं? ‘या’ गॅझेटमुळे तुमचं काम होईल सोपं
आपली अनेक कामं ChatGPT च्या मदतीने अगदी सहज शक्य होतात. सध्या मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं AI चॅटबोट म्हणजे ChatGPT. पण AI कंटेंटमुळे मूळ मजकुराला महत्त्व मिळत नाही आणि कंटेट चोरीची भीती कायम आहे. तुम्ही सुध्दा तुमच्या कॉलेज आणि शाळेचे असाईंनमेंट पूर्ण करण्यासाठी किंवा ऑफीसमध्ये प्रझेंटेशन तयार करण्यासाठी ChatGPT चा वापर करताय का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ChatGPT च्या मदतीने तयार करण्यात आलेला कंटेट ओळण्यासाठी आता टेक्स्ट वॉटरमार्किंग टूल लाँच करण्यात आलं आहे. ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI कडे टेक्स्ट वॉटरमार्किंग टूल उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा- ‘या’ 35 स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद! यादीत तुमचा फोन तर नाही ना, लगेच तपासा
OpenAI चा दावा आहे की, जे विद्यार्थी त्यांचे असाईंनमेंट पूर्ण करण्यासाठी आणि जे कर्मचारी ऑफीसमध्ये प्रझेंटेशन तयार करण्यासाठी ChatGPT चा वापर करत आहेत, त्यांच्यासाठी हे टूल आहे. ChatGPT च्या मदतीने तयार करण्यात आलेला कंटेट आता लगेच ओळखता येईल. पण कंपनी हे टूल रिलीज करणार नाही. कारण हे टूल रिलीज केल्यानंतर लोकांमध्ये ChatGPT चा वापर करताना पकडले जाण्याची भिती निर्माण होईल. त्यामुळे अनेकजण ChatGPT चा वापर करणं टाळू शकतात. यामुळे कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, OpenAI मध्ये वॉटरमार्किंग सिस्टम आहे. या प्रणालीच्या मदतीने चॅटजीपीटीच्या मदतीने तयार केलेला कंटेंट सहज शोधला जाऊ शकतो. मात्र कंपनीने हे टूल सध्या होल्डवर ठेवले आहे. या टूलबद्दल प्रत्येकाचं मत वेगळ आहे. अनेकजण हे टूल रिलीज करण्यासाठी तयार आहेत, मात्र अनेकांनी यासाठी नकार दिला आहे. कारण जर ChatGPT च्या मदतीने तयार करण्यात आलेला कंटेट ओळण्यासाठी मदत होऊ लागली, तर लोकं ChatGPT चा वापर करणं टाळतील. परिणामी कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागेल.
ChatGPT चा वापर शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी करतात. अशा परिस्थितीत शिक्षकांची फसवणूक झाल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. OpenAI च्या वॉटरमार्किंग टूलद्वारे ही समस्या दूर केली जाऊ शकते. कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये असंही लिहिलं आहे की आमच्या टीमने टेक्स्ट वॉटरमार्किंग पद्धत विकसित केली आहे. जर अधिक लोकांनी या प्रकारचे टूल वापरण्यास सुरुवात केली, तर लोक कंपनीचे ChatGPT चॅटबॉट वापरण्यास घाबरतील. याचा अर्थ ChatGPT वापरणाऱ्यांची संख्या कमी होईल. त्यामुळे कंपनी कधीही आपले युजर्स गमावू इच्छित नाही.