फोटो सौजन्य - pinterest
राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळ्यात सगळ्यात मोठं टेंशन म्हणजे, कपडे सुकवण्याचं. पावसात कपडे सुकत नाहीत. पावसाळ्यात कपडे सुकवणं खूप कठीण होतं. ओल्या कपड्यांना प्रचंड वास येतो. तसेत ओले कपडे वापरल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. विशेषतः ऑफिस किंवा शाळेत जाणाऱ्यांसाठी ही मोठी समस्या आहे. पण आता तुमचं कपडे सुकवण्याचं टेंशन मिटलं. बाजारात असे काही गॅझेट्स उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज कपडे सुकवू शकता. विशेषतः पावसाळ्यात असे गॅझेट्स प्रचंड उपयोगी पडतात.
हेदेखील वाचा- ‘या’ 35 स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद! यादीत तुमचा फोन तर नाही ना, लगेच तपासा
पावासाळ्यात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही पोर्टेबल क्लोथ ड्रायरचा वापर करू शकता. काही मिनिटांत कपडे सुकविण्यासाठी पोर्टेबल क्लोथ ड्रायर अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही कोठेही जात असाल कर प्रवासात हे गॅझेट अगदी सहज घेऊन जाऊ शकता. पावसाळ्यात ओल्या कपड्यांची समस्या जवळपास प्रत्येकालाच सतावत असते. अशा परस्थितीत पोर्टेबल क्लोथ ड्रायर एक उत्तम उपाय ठरू शकतो. याचा आकार लहान असल्याने तुम्ही प्रवासात देखील हे गॅझेट सहज घेऊन जाऊ शकता. पोर्टेबल क्लोथ ड्रायरमुळे तुम्हाला प्रवासात ओल्या कपड्यांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. हे गॅझेट काही मिनिटांतच तुमचे ओले कपडे सुकवण्यासाठी मदत करते.
हेदेखील वाचा- रोबोट खिशात हात घालून पदक जिंकू शकतात का? ऑलिंपिक चॅम्पियन नेमबाजचा Elon Musk ला प्रश्न
तुम्ही ई कॉमर्स वेबसाईट असलेल्या Amazon वरून पोर्टेबल क्लोथ ड्रायर खरेदी करू शकता. बाजारात अनेक इलेक्ट्रिक पोर्टेबल कॉम्पॅक्ट लॉन्ड्री ड्रायर उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे हे ड्रायर बजेट किंमतीत खरेदी करता येणार आहेत. 220 व्होल्ट ड्रायरचा रिव्ह्यु सर्वात चांगला आहे. ह्या ड्रायरला लोकांची प्रचंड पंसती मिळत आहे. ई कॉमर्स साइट Amazon India वर या इलेक्ट्रिक पोर्टेबल कॉम्पॅक्ट ड्रायर्सच्या खरेदीवर डिस्काऊंट देखील मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही 4 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक पोर्टेबल कॉम्पॅक्ट ड्रायरची खरेदी करू शकता.
220V इलेक्ट्रिक पोर्टेबल कॉम्पॅक्ट लॉन्ड्री ड्रायर Amazon वर 58 टक्के डिस्काउंटनंतर 3,799 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही EMI वर देखील हे गॅझेट खरेदी करू शकता. 220V इलेक्ट्रिक पोर्टेबल कॉम्पॅक्ट लॉन्ड्री ड्रायरची कपडे सुकवण्याची क्षमता 5KG आहे. यासोबतच Auslese पोर्टेबल मिनी क्लोथ ड्रायर देखील Amazon वर उपलब्ध आहे. ग्राहक 3,645 रुपयांच्या बजेट किंमतीत पोर्टेबल मिनी क्लोथ ड्रायर खरेदी करू शकतात. यामध्ये एबीएस प्लास्टिक आणि नायलॉन मटेरियल वापरण्यात आले आहे. हे शूज, मोजे किंवा लहान घरगुती वस्तू सुकविण्यासाठी वापरले जाऊ शकते. यावर ग्राहकांसाठी EMI चा पर्यायही उपलब्ध आहे.
Auslese पोर्टेबल मिनी ड्रायर तुम्ही तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकता. याचा आकार लहान असल्यामुळे ते प्रवासात सहज घेऊन जाता येईल. यामुळे आता तुम्ही पावासाळ्यात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही पोर्टेबल क्लोथ ड्रायरचा वापर करू शकता. काही मिनिटांत कपडे सुकविण्यासाठी पोर्टेबल क्लोथ ड्रायर अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही कोठेही जात असाल कर प्रवासात हे गॅझेट अगदी सहज घेऊन जाऊ शकता.