Emoji पाठवल्यास होऊ शकते जेल! या देशात आहे विचित्र नियम, उल्लंघन केल्यास भरावा लागेल 1 लाख रुपयांचा दंड
व्हॉट्सॲप हा एक असा लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर जगभरातील अनेक लोक करत असतात. यावर युजर्सना अनेक वेगवगेळे फीचर्स पुरवले जातात. यातीलच एक फिचर म्हणजे, Emoji पाठवणे. आपल्यातील अनेकांना चॅट करताना टाइप करण्याचा फार कंटाळा येतो अशात युजर्स या ईमोजी फीचरचा वापर करू शकता. आपल्या भावना या इमोजींच्या मदतीने व्यक्त करता येतात. मात्र आता एका देशात एका विचित्र नियम आह, इथे इमोजी पाठवल्यास तुरुंगात जावे लागू शकते. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे.
व्हॉट्सॲप यूजर्सच्या एका चुकीमुळे त्यांना तुरुंगात जावे लागू शकते. आम्ही असे म्हणत आहोत कारण तुम्हाला नवीन नियमाबद्दल जाणून आश्चर्य वाटेल. लोकांनी ‘रेड हार्ट’ इमोजी पाठवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते. हा अजब नियम सौदी अरेबियात जारी करण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार आरोपी दोषी आढळल्यास त्याला 2 ते 5 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
हेदेखील वाचा – Amazon Great Indian Festival 2024: 38 हजाराहून कमी किमतीत मिळत आहे iPhone 13
याशिवाय त्याला 1 लाख सौदी रियालचा दंडही होऊ शकतो. ही एक आश्चर्यकारक बातमी आहे जी अनेकांना चिंतेत टाकू शकते. एका निवेदनानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली. सौदीच्या सायबर क्राईम तज्ज्ञांनी याचा खुलासा केला आहे. यानुसार, कोणी एखाद्याला रेड हार्ड इमोजी पाठवला आणि त्याने याविरुद्ध तक्रार केली तर इमोजी पाठवणाऱ्या युजरला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
हेदेखील वाचा – दिवाळी सेलचा घ्या लाभ! 15,000 हुन कमी पैशात खरेदी करता येणार Redmi, Realme आणि Samsung चे दमदार टॅब्लेट
तज्ज्ञांनी सांगितले की, देशात ‘रेड हार्ट’ इमोजी पाठवल्याने लोक अडचणीत येऊ शकतात. कारण त्याकडे छळाच्या श्रेणीत पाहिले जाईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही असे करताना आढळले तर तुम्हाला नक्कीच कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळेच इथले लोक आता हे इमोजी पाठवण्याचे टाळत आहेत. तक्रार आल्यानंतर अशा प्रकरणांवर गुन्हा दाखल करता येईल, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. तसेच, या गोष्टी आता गांभीर्याने घेतल्या जातात.