Amazon Great Indian Festival सेल 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. Amazon प्राइम सदस्यांसाठी ही सेल 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. Amazon च्या ऍन्युअल फेस्टिव सेल दरम्यान, Apple iPhone 13 चा 128GB व्हेरियंट 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला ॲमेझॉन सॅकमध्ये iPhone वर उपलब्ध असलेल्या काही स्पेशल डील्सविषयी सविस्तर माहिती देत आहोत. तुम्हालाही कमी किमतीत आयडॉन खरेदी करायचा असल्यास या सुवर्णसंधीचा लवकरात लवकर लाभ घ्या.
ॲमेझॉनचे म्हणणे आहे की iPhone 13 वर उपलब्ध असलेली ऑफर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमधील ‘किंग ऑफ ऑल डील’ आहे. Apple iPhone 13 चा 128GB व्हेरिएंट सध्या 47,500 रुपयांना सूचीबद्ध आहे. या सेल दरम्यान ते 42,000 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. ॲमेझॉन सेल दरम्यान, SBI डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट उपलब्ध आहे. बँक डिस्काउंटसह, तुम्ही ते 37,999 रुपयांना खरेदी करू शकता.
हेदेखील वाचा – दिवाळी सेलचा घ्या लाभ! 15,000 हुन कमी पैशात खरेदी करता येणार Redmi, Realme आणि Samsung चे दमदार टॅब्लेट
ॲमेझॉनच्या या फेस्टिव्ह सेलमध्ये ग्राहक फक्त आयफोनच नाही तर इतर कंपन्यांचेही दर्जेदार स्मार्टफोन्स, टीव्ही अशा अनेक उपकारांवर विशेष सूटचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये प्रत्येक गोष्टीवर मिळणारी सूट ही ग्राहकांच्या फायद्याची आहे. या सेलचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ॲमेझॉनच्या अधिकृती वेब साईटला भेट देऊ शकता.
हेदेखील वाचा – BSNL नंबरवर 4G ऍक्टिव्ह आहे की नाही? या ट्रिकच्या मदतीने क्षणार्धात शोधून काढा
2021 मध्ये Apple iPhone 13 69,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हा आयफोन सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले सह येतो. कंपनीने iPhone 13 मध्ये A15 Bionic चिप दिली आहे. या प्रोसेसरमध्ये, कंपनीने 15 अब्ज ट्रान्झिस्टरसह 2 उच्च कार्यक्षमता कोर आणि 4 हाई-एफिसिएंसी कोर दिले आहेत. आयफोन 13 च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात प्रगत ड्युअल-कॅमेरा सिस्टमसह 12MP रुंद आणि अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. यासोबतच यात 12MP TrueDepth फ्रंट कॅमेरा आहे. कमी प्रकाशात उत्तम फोटोग्राफीसाठी यात ओआयएस देण्यात आला आहे. यासह, हे 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगला देखील समर्थन देते.