WhatsApp Call मुळे तुमचे लोकेशन ट्रॅक होऊ शकते, लगेच करा ही सेटिंग (फोटो सौजन्य-X)
ऑफिसपासून दैनंदिन कामापर्यंत, WhatsApp शिवाय आज एकाही दिवसाची कल्पनाही करता येत नाही. यामुळेच WhatsApp च्या वाढत्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल पण तुमचे व्हॉट्सॲप कॉल देखील ट्रॅक केले जाऊ शकतात हे तुम्हाला माहीतय का? व्हॉट्सॲप कॉलिंगदरम्यान तुमचा आयडी ॲड्रेस ट्रॅक केला जाऊ शकतो, कॉलिंगदरम्यान यूजर्सचे लोकेशन कोणीही ट्रेस करू नये यासाठी व्हॉट्सॲपने एक सोय केली आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप कॉल तुमच्या सुरक्षित राहु शकतो. पण असे अनेक यूजर्स आहेत ज्यांना व्हॉट्सॲपमधील या छुप्या फीचरची माहिती नसते.
तुम्हालाही व्हॉट्सॲप कॉल्स दरम्यान कोणतेही हॅकर किंवा स्कॅमर तुमचे लोकेशन ओळखू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर यासाठी तुम्हाला लगेचच व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन प्रोटेक्ट आयपी ॲड्रेस इन कॉल्स फीचर चालू करावे लागेल. हे फीचर चालू करण्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
व्हॉट्सॲपमध्ये हे सेफ्टी फीचर ऑन करणं खूप गरजेचं आहे, जेणे करून तुम्ही कॉलिंगदरम्यान नेहमी स्वत:ला सुरक्षित ठेवू शकता. पण प्रश्न असा आहे की हे फीचर सेटिंग्जमध्ये कुठे मिळेल? हे फीचर शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल, त्यानंतर राइडच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
यासाठी आधी तीन बिंदूंवर टॅप केल्यानंतर, सेटिंग्जवर क्लिक करा, सेटिंग्ज उघडल्यानंतर, गोपनीयता पर्यायावर टॅप करा. प्रायव्हसी ऑप्शनमध्ये तुम्हाला हे फीचर ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये दिसेल, या फीचरच्या नावापुढे एक बटण आहे, ते दाबून हे फीचर तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटसाठी चालू होईल. हे फीचर चालू केल्यानंतर, तुमचे सर्व कॉल व्हॉट्सॲप सर्व्हरवरून जातील त्यामुळे तुम्ही नेहमी सुरक्षित राहाल.
Cube ACR: हे एक लोकप्रिय कॉल रेकॉर्डिंग ॲप आहे जे केवळ व्हॉट्सॲपच नाही तर इतर व्हीआयपी कॉल देखील रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.
Salestrail: विशेषत: व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेले एक प्रीमियम कॉल रेकॉर्डिंग ॲप आहे.
ACR कॉल रेकॉर्डर: या लोकप्रिय ॲपचा इंटरफेस वापरण्यास अतिशय सोपा आहे.