Tech Tips: Instagram वर मित्राचे DM वाचा आणि त्याला कळणारही नाही! ही आहे सोपी ट्रीक
सोशल मीडियाच्या या युगात, इंस्टाग्राम हे एक अतिशय लोकप्रिय ॲप आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही फोटो, व्हिडीओ शेअर करू शकता. तसेच तुम्ही इंस्टाग्रामवर तुमच्या मित्रांसोबत सहज चॅट करू शकता. इंस्टाग्रामवर तुम्ही अनेकांना फॉलो करता आणि अनेकजण तुम्हाला फॉलो करतात. इंस्टाग्राम तुम्हाला असे अनेक फीचर्स ऑफर करते, ज्यामुळे तुम्हाला अॅप वापरण्याची अधिक मजा येते. इंस्टाग्रामवर काही सीक्रेट ट्रीक्स देखील आहेत. या सीक्रेट ट्रीक्स अनेकांना माहिती नसतात. अशाच एका सीक्रेट ट्रीकबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Vivo घेऊन येतोय Mixed Reality Headset! Apple Vision Pro ला देणार जबरदस्त टक्कर
इंस्टाग्रामच्या डीएममध्ये तुम्हाला अनेकांचे मॅसेज येत असतात. तुम्ही एखादा मॅसेज ओपन केला तर समोरच्या व्यक्तिला लगेच समजतं. पण आता आम्ही तुम्हाला अशी एक ट्रीक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही इंस्टाग्रामवर तुमच्या मित्राचा मॅसेज ओपन केला तरी देखील त्याला समजणार नाही. मित्राच्या नकळत तुम्ही तुमच्या मित्राचा DM वाचू शकता. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
आता आम्ही तुम्हाला अशी एक ट्रीक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्राचा मॅसेज वाचला तरी देखील त्याला कळणार नाही. म्हणजे मॅसेज वाचल्यानंतरही इंस्टाग्रामवर खाली दिसणारी Read Receipt टिक दिसणार नाही. होय, इंस्टाग्रामचे हे फीचर व्हॉट्सॲपच्या फीचरसारखेच आहे ज्यामध्ये तुम्ही मॅसेज वाचला तरी समोरच्या व्यक्तिला समजणार नाही. इंस्टाग्रामचे हे सीक्रेट फीचर कसे वापरायचे ते जाणून घेऊया.
MahaKumbh 2025: कुंभ मेळ्यात जाण्याचा प्लॅन करताय? Google Maps चे हे 5 फीचर्स करतील मदत
इंस्टाग्रामने रीड रिसिप्ट्स नावाचे एक फीचर जोडले आहे. या फीचरमध्ये तुम्ही सेंडरला वाचलेल्या मॅसेजची माहिती द्यायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही मॅसेज वाचला आहे हे समोरच्याला कळू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला इंस्टाग्रामच्या सेटिंग्जमध्ये थोडासा बदल करावा लागेल. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे फीचर सुरु करू शकता.