व्हॉट्सॲप फिचर्स : व्हॉट्सॲप नेहमीच अपडेटेड फिचर्स घेऊन येत असत. आतादेखील मेटाने व्हाट्सॲपचे नवे फिचर लाँच केले आहे. व्हाट्सॲपने युजर्ससाठी इन्स्टंट व्हिडीओ मेसेज फिचर (WhatsApp Instant video messages feature) आणले आहे. या नव्या फिचरमध्ये नवीन झटपट व्हिडीओ मेसेज वैशिष्ट्यांसह, व्हॉट्सॲप यूजर्स आपल्या चॅटमध्ये लहान व्हिडीओ मेसेज पाठवू आणि रिसिव्ह करू शकणार आहेत. या फीचरमुळे व्हाट्सॲप युजर्सचा मेसेजिंग अनुभव आणखी चांगला होण्याची शक्यता आहे. इन्स्टंट व्हिडीओ मेसेज व्हाट्सॲपमध्ये आधीपासून असलेल्या ईस मेसेज फीचरसारखाच आहे. याशिवाय, नवीन व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड करण्याची पद्धत देखील व्हॉईस मेसेजसारखीच (Voice Message) आहे.
नवे फिचर वापरायचे कसे?
हे नवीन फीचर वापरण्यासाठी यूजर्सना सर्वात आधी एका चॅटमध्ये जावं लागेल.
यानंतर, टेक्स्ट फील्डजवळ दिसणार्या व्हॉईस आयकॉनवर टॅप केल्याने कॅमेरा आयकॉन समोर येईल.
यानंतर व्हॉईस मेसेजप्रमाणे व्हिडीओ रेकॉर्ड करता येईल.
यूजर्स आपल्या संपर्कांसह ६० सेकंदांपर्यंतचे झटपट व्हिडीओ रेकॉर्ड आणि शेअर करू शकतात.
यूजर्स रेकॉर्डिंग करताना स्वाईप अप करून लॉक करू शकतात आणि नंतर व्हिडीओ हँड्स-फ्री मोडमध्ये रेकॉर्ड करता येईल.
‘असं’ ऑन-ऑफ करता येईल