फोटो सौजन्य -iStock
Apple ने ‘Apple Intelligence’ AI, Google ने Gemini, Samsung ने Galaxy AI असिस्टंट लाँच केलं. Meta ने लाँच केलेलं AI चॅटबोट ChatGPT आणि Gemini ला टक्कर देत आहे. जगभरात Mobile AI ची क्रेझ वाढत आहे. अनेक कामांसाठी लोक AI वर अवलंबून असतात, असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधणं असो किंवा कोणत्या विषयावर माहिती शोधणं, आपण आपल्या अनेक कामांसाठी Mobile AI चा वापर करतो. आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये दिसणारे AI असिसस्टंट आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. पण या Mobile AI मुळे आपल्या जीवनावर परिणाम होऊन आपली जगण्याची पध्दत बदलू शकते का? याबाबत Samsung ने खुलासा केला आहे.
Samsung ने Mobile AI संदर्भात एक संशोधन केलं आहे. या संशोधनात त्यांनी पाच वेगवेगळ्या देशांतील 5 हजार लोकांचा समावेश केला. यानंतर त्या लोकांना Mobile AI वापरण्यास सांगितलं. यानंतर, कंपनीने संबंधित लोकांच्या वापराची पद्धत तपासली आणि ते Mobile AI चा कसा फायदा घेतात ते पाहिले आणि त्याचा अभ्यास केला. या अभ्यासातून Mobile AI मुळे आपली जगण्याची पध्दत बदलणार का, याबाबतत Samsung ने खुलासा केला आहे. Samsung च्या संशोधनात सांगण्यात आलं आहे की, Mobile AI मुळे आपली जगण्याची पध्दत बदलू शकते. Mobile AI आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी मदत करेल.
Samsung ने या संबंधित एक अहवाल सादर केला आहे. अहवालात सांगितलं आहे की, Mobile AI चा वापर आणि जीवन सुधारण्याचे मार्ग यांच्यात मजबूत संबंध असल्याचे या अभ्यासातून समोर आलं आहे. Mobile AI च्या मदतीने, युजर्स त्यांचे जीवन सुधारू शकतात. याद्वारे ते त्यांची क्रिएटिविटी, प्रोडक्टिविटी आणि सामाजिक संबंध सुधारू शकतात. याशिवाय भाषेच्या स्वरूपात निर्माण होणारे अडथळेही दूर करता येतात. संशोधनातून समोर आलं आहे की, 52 टक्के लोक भविष्याच्या दृष्टीने Mobile AI चा वापर करू इच्छितात. 16 टक्के युजर्स सतत Mobile AI वापरतात. याशिवाय 54 टक्के लोकांनी त्यांची क्रिएटिविटी दाखवण्यासाठी AI चा वापर केला आहे. जवळपास निम्म्या लोकांनी याचा उपयोग माहिती मिळवण्यासाठी आणि नोट्स बनवण्यासाठी केला आहे. तर 56 टक्के लोकांनी भाषांतरासाठी AI चा वापर केला, जेणेकरून भाषिक अडथळे दूर होतील.
लंडन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ.चॅरिस ब्रॉवर म्हणाले की, Mobile AI चा वापर शिक्षण क्षेत्रात करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने क्रिएटिविटी, प्रोडक्टिविटी, सामाजिक संबंध आणि शारीरिक आरोग्य सुधारले जाऊ शकते. Samsung चे हे सर्वेक्षण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. या सर्वेक्षणात फ्रान्स, जर्मनी, कोरिया, ब्रिटन आणि अमेरिका (यूएस) येथील लोकांचा समावेश करण्यात आला होता.