1973 साली लाँच झाला जगातील पहिला फोन! ना डिस्प्ले ना कॅमेरा, पण किंमत वाचून चक्रवाल
आपण आपल्या स्मार्टफोनशिवाय एक दिवस देखील राहणं कठिण आहे. आपला स्मार्टफोन बिघडला किंवा त्याला चार्जिंग नसेल तर अशावेळी काय करायचं हे आपल्याला सूचत नाही. आपण स्मार्टफोनशी खूप अटॅच असतो. आपलं कोणतंही कामं स्मार्टफोनशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याला प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनची गरज असते. काही लोकांसाठी स्मार्टफोन म्हणजे जीव की प्राण असतो. तुम्ही असे अनेक लोकं पाहिले असतील जे स्वत: पेक्षा जास्त त्यांच्या स्मार्टफोनची काळजी घेतात.
लहान मुलांकडे देखील त्यांचा स्मार्टफोन असतो. प्रत्येकाला स्मार्टफोनची क्रेझ आहे. लोकांना बेझेल कमी डिझाइन, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि उच्च मेगापिक्सेल कॅमेरा असलेले फोन खरेदी करायला आवडतात. अगदी कंपन्याही वेळोवेळी लेटेस्ट डिझाईन असलेले स्मार्टफोन लाँच करत असतात. प्रत्येक स्मार्टफोनची डिझाईन अतिशय हटके असते आणि फीचर्स देखील कमाल असतात. स्मार्टफोन जेवढा चांगला तेवढी त्याची किंमत जास्त. (फोटो सौजन्य – pinterest)
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
स्मार्टफोनच्या वाढत्या जगात तुम्हाला माहीत आहे का जगातील पहिला फोन कोणता होता? कोणी लाँच केला होता? जगातील पहिल्या फोनची किंमत तुम्हाला माहीत आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर फार कमी लोकांकडे असतील. आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.
जगातील पहिला फोन 1973 साली लाँच झाला होता. जगातील पहिल्या फोनचे नाव Motorola DynaTAC 8000x होते. हा फोन Motorola ने 48 वर्षांपूर्वी म्हणजेच 1973 मध्ये लाँच केला होता. 3 एप्रिल 1973 रोजी मोटोरोलाने जगातील पहिला फोन Motorola DynaTAC 8000x लाँच केला. त्या काळात लाँच इव्हेंट किंवा व्हर्च्युअल इव्हेंटचा पर्याय नव्हता. यावेळी Motorola DynaTAC 8000x हा एक प्रोटोटाइप होता, जो डॉ. मार्टिन कूपर यांनी जगासमोर आणला होता. वायरलेस पद्धतीने बोलण्यासाठी हा फोन लाँच करण्यात आला होता.
Motorola DynaTAC 8000x फोनमध्ये डिस्प्ले नव्हता. फोनची बटणे खूप मोठी होती आणि फोनचा लूकही चांगला नव्हता. फोन ऍक्सेस करण्यासाठी कोणत्याही मशीनचा वापर केला नाही. हे पूर्णपणे हाताने बनवले होते. हा फोन व्यावसायिक पातळीवर बाजारात येण्यासाठी 10 वर्षे लागली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोटोरोलाने हा फोन बनवण्यासाठी 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. या फोनचा पहिला सेल 6 मार्च 1983 रोजी झाला होता.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये जास्त फीचर्स नव्हते. DynaTAC 8000X चे बॅटरीचे आयुष्य अंदाजे एक तास टॉक टाइम होते. हा फोन चार्ज करण्यासाठी सुमारे 10 तासांचा कालावधी लागायचा. फोन एका ब्रीफकेसमध्ये ठेवला होता. काही वेळ बोलून झाल्यावर तो बंद केला म्हणजे त्याची बॅटरी सेव्ह व्हायची. संपर्कांशिवाय फोनमध्ये काहीही सेव्ह केले जाऊ शकत नाही.
मोटोरोला स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या फोनची किंमत 3995 डॉलर्स म्हणजेच 3,37,488 रुपये होती. आता या फोनची किंमत 10,000 डॉलर्स म्हणजेच 8,44,777 रुपये झाली असती. फोन वापरण्यासाठी, दरमहा सुमारे 50 डॉलर भाडे द्यावे लागायचे. हा फोन रेडिओ फोन होता जो सिग्नलच्या मदतीने काम करत होता.