2025 मध्ये स्मार्टफोन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता; ही असू शकतात महत्त्वाची 3 कारणं
जगभरात स्मार्टफोन युजर्स आणि स्मार्टफोन टेक्नोलॉजीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. टेक कंपन्या नवीन डिझाईन आणि फीचर्ससह त्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीमुळे टेक कंपन्यामधील स्पर्धा देखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. 2024 मध्ये देखील अनेक नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले. ज्यामध्ये सर्वाधिक फोल्ड आणि फ्लिप स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
हेदेखील वाचा- Jio आणि Disney+ Hotstar साठी JioHotstar डोमेनचा मार्ग मोकळा? जैनम आणि जीविका मोफत डोमेन देण्यास तयार!
अनेक कंपन्यांनी 2024 मध्ये त्यांचे ब्रँडेड स्मार्टफोन अनोख्या फीचर्ससह जास्त किंमतीत लाँच केले. तर काही कंपन्यांनी त्यांचे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स नवीन डिझाईनसह कमी किंमतीत लाँच केले. अनेक स्मार्टफोन्स 10 ते 12 हजार रुपयांच्या किंमतीत म्हणजेच मिड रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. पण 2025 मध्ये स्मार्टफोनच्या किंमती वाढून स्मार्टफोन महाग होऊ शकतात. यामागे तीन मोठी कारणे समोर आली आहेत. AI चा वापर वाढत असल्याने मोठ्या टेक कंपन्याही AI वर भर देत आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
AI चा वापर स्मार्टफोनच्या वाढत्या किंमतीसाठी कारणीभुत ठरू शकतो. AI ने संपूर्ण जग व्यापलं आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये देखील अनेक AI फीचर्स उपलब्ध आहेत, ज्यांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मात्र याच AI मुळे आता स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
2025 मध्ये स्मार्टफोनच्या किंमती वाढण्यामागे तीन कारणे असू शकतात. पहिले, चांगल्या कॉम्पोनेंट्सच्या वाढत्या किमती, दुसरे म्हणजे 5G नेटवर्कच्या आगमनामुळे वाढणारा खर्च आणि तिसरे म्हणजे AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वाढता वापर. काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, 2024 मध्ये स्मार्टफोनची सरासरी किंमत 3% आणि 2025 मध्ये 5% वाढू शकते. कारण लोक आता अधिक शक्तिशाली प्रोसेसर आणि AI असलेले महागडे फोन खरेदी करत आहेत.
हेदेखील वाचा- सरकारचा सर्वात मोठा Digital Strike! 1.77 कोटी सिम कार्ड ब्लॉक, जाणून घ्या का घेतला हा निर्णय
जनरेटिव्ह एआयमुळे स्मार्टफोन महाग होत आहेत. लोकांना AI फीचर्स खूप आवडतात. त्यामुळे स्मार्टफोन उत्पादक कंपन्या अधिक शक्तिशाली CPU, NPU आणि GPU असलेल्या चिप्स बनवत आहेत. या चिप्सची किंमत सहसा खूप जास्त असते, ज्यामुळे फोनची किंमत देखील वाढते. 4nm आणि 3nm सारख्या चिप्स बनवण्याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे कॉम्पोनेंट्सच्या किंमतीही वाढत आहेत. याशिवाय कंपन्यांना सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात.
तंत्रज्ञान जसजसे विकसित होत आहे, तसतसे स्मार्टफोनही अपग्रेड होत आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या किमतींसोबतच चांगले फोनही बाजारात येत आहेत. यामध्ये अधिक चांगला कॅमेरा आणि अधिक बुद्धिमान वर्चुअल असिस्टेंट यांचा समावेश आहे. येत्या काळात खास फीचर्स असलेले स्मार्टफोन्सही पाहायला मिळू शकतात. उत्तम फीचर्स आणि चांगले कॉम्पोनेंट्स यांमुळे स्मार्टफोनच्या किंमती वाढू शकतात.