जगातील सर्वात मोठा YouTuber घेऊन येत आहे नवीन रिॲलिटी शो, 14 मिलियन डॉलर्सचा खर्च, कन्टेस्टंट्ससाठी तयार केले नवीन शहर
जगातील सर्वात मोठा युटूबर (YouTuber) मिस्टर बीस्ट त्याचा स्वतःचा एक नवीन रिॲलिटी शो घेऊन येत आहे. ज्याचे नाव आहे ‘बीस्ट गेम्स’ (Beast Games) असे असणार आहे. हा शो 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याच्या शोबद्दल उत्सुक असलेल्या जिमी डोनाल्डसनने X या सोशल साइटवर त्याच्या हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत आणि सांगितले आहे आहे की, त्याच्या आगामी रिॲलिटी शो ‘बीस्ट गेम्स’ साठी त्याने $14 दशलक्ष खर्च करून एक भव्य शहर उभारले आहे. हे शहर टोरंटोमध्ये बांधले गेले आहे. ज्यामध्ये ‘बीस्ट गेम्स’चे स्पर्धक असतील आणि इथे ते गेमसाठी एकमेकांशी स्पर्धा करतील.
सोशल मीडियावर फोटोज झाले व्हायरल
मिस्टर बीस्ट म्हणून ओळखला जाणारा जगातील सर्वात मोठा युटूबर जिमी डोनाल्डसन याने त्याच्या पोस्टमध्ये शोच्या सेटचा एक फोटो शेअर केला आहे. रिॲलिटी शोच्या सेटच्या फोटोजची आणि उभारलेल्या नवीन शहराची इंटरनेटवर आता तुफान चर्चा रंगात आहे. पोस्ट शेअर केल्यापासून हे फोटो 1 कोटी 8 लाख लोकांनी पाहिले आहेत आणि 93 हजार लोकांनी लाईक केले आहेत. याशिवाय मिस्टर बिस्टच्या या पोस्टवर लाखो लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत.
We spent $14,000,000 building a city in a field for the contestants in Beast Games to live and compete in.. December 19th is almost here 🥰 pic.twitter.com/gFxjTq5CFD
— MrBeast (@MrBeast) December 8, 2024
पोस्टवर कमेंट्सने घातला धुमाकूळ
शोबद्दलच्या त्याच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले – मी दु:खी आहे पण 14 मिलियन डॉलर खर्च करून 25 मिनिटांचा व्हिडिओ बनवणे योग्य गोष्ट नाही. तुम्ही हे पैसे कुठेतरी अधिक चांगल्या आणि उपयुक्त ठिकाणी खर्च करू शकता. मिस्टर बिस्टने स्वतः या युजरच्या कमेंटला उत्तर दिले आणि म्हणाले, “हम्म, हा 25 मिनिटांचा यूट्यूब व्हिडिओ नाही तर हा शो 10 एपिसोडमध्ये बनवला गेला आहे, जो Amazon Prime वर रिलीज केला जाईल.”
व्हॉट्सॲपचे आश्चर्यकारक फिचर! आता कोणीही ऐकू नाही शकणार तुमचा Voice Message
शो’साठी खर्च केले 100 मिलियन डॉलर्स
अलीकडे, मिस्टर बीस्टला युटूबर KSI आणि लोगन पॉलसोबत पॉडकास्टमध्ये पाहिले गेले. जिथे त्याने आपल्या मुलाखती दरम्यान सांगितले की, या शोच्या निर्मितीसाठी 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आला आहे आणि त्याने आतापर्यंत 40 पेक्षा जास्त जागतिक विक्रम केले आहेत. हे ज्ञात आहे की मिस्टर बीस्टला युट्युबवर सर्वाधिक लोक फॉलो करतात आणि सध्या त्यांचे 335 दशलक्ष सब्स्क्रायबर्स आहेत.