XIAOMI(फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
Xiaomiचा आज (26 जून ) ला चीनमध्ये मोठा इव्हेन्ट होणार आहे. या इव्हेन्टमध्ये Mix Flip 2 फोल्डेबल स्मार्टफोनचे अनवील करण्यासाठी तैयार आहे. नवीन फोल्डबले स्मार्टफोन सोबतच कंपनी Redmi K80 Ultra, Xiaomi Pad 7S Pro, आणि Redmi K Pad सह अनेक उतपादन सादर करणार आहे. या इन्व्हेन्टमध्ये नवीनतम इलेक्ट्रिक एसयूव्ही, नवीन टीडब्ल्यूएस इयरफोन आणि नवीन वेअरेबल्स देखील सादर होतील. आता Xiaomiने पुष्टी केली आहे की या लाइनअपमध्ये, कंपनी नवीन एआय-पॉवर्ड स्मार्ट ग्लासेस प्रदर्शित करेल, जे Meta च्या Ray-Ban स्मार्ट ग्लासेसशी स्पर्धा करतील.
Motorola Edge 50 Pro वर मिळत आहे मोठं डिस्काउंट, जाणून घ्या डीलची संपूर्ण माहिती
Xiaomi च्या नवीन स्मार्ट ग्लासेसचा समोर आला टीजर
Weibo पोस्टमध्ये, Xiaomiने खुलासा केला आहे की याचे AI ग्लासेस २६ जूनला संध्याकाळी 4:30 वाजता अनाउंस होणार; टीजरला ‘नेक्स्ट जेनरेशन ऑफ पर्सनल स्मार्ट डिवाइस’ अशी टॅगलाईन सोबत पोस्ट करण्यात आला आहे. या डिवाइसला कोणी तरी घालून दाखवला आहे. हे इनबिल्ट कॅमेऱ्यांसह दिसले आहेत आणि ब्रँडने शेअर केलेले टीझर व्हिडिओ स्मार्ट ग्लासेस ते फर्स्ट-पर्सन व्यू व्हिडिओ कॅप्चर करण्याला हायलाईट करत आहे.
Xiaomi चे AI ग्लासेस Meta च्या Ray-Ban स्मार्ट आयवेअरशी थेट स्पर्धा करण्याची शक्यता आहे. या ग्लासेसमध्ये इंटीग्रेटेड ऑडिओ मॉड्यूल असू शकते. Ray-Ban Meta ग्लासेसची लोकप्रियता पाहता, Apple आणि Google सारख्या मोठ्या कंपन्यांकडूनही चांगल्या वैशिष्ट्यांसह आणि अधिक स्पर्धात्मक किंमतीसह नवीन AI-पावर्ड वेअरेबल्स आणण्याची अपेक्षा आहे.
चिनी टेक ब्रँडने आधीच पुष्टी केली आहे की ते 26 जून रोजी Mix Flip 2, Redmi K80 Ultra, Xiaomi Pad 7S Pro, आणि Redmi K Pad चे अनावरण करणार आहे. ब्रँडच्या नवीन अॅक्सेसरीज – Smart Band 10, Watch S4 41mm और Open Earphones Pro चेही या कार्यक्रमात अनावरण केले जाईल. शाओमी YU7 इलेक्ट्रिक कार देखील या कार्यक्रमात अधिकृतपणे सादर केली जाईल.
Xiaomi Weiboवर त्यांच्या नवीन उत्पादनांच्या स्पेसिफिकेशन्सची सक्रियपणे माहिती देत आहे. Xiaomi Mix Flip 2 4.01-इंचाचा कव्हर डिस्प्ले आणि 6.86 इंचाचा इनर डिस्प्ले असेल. यात Snapdragon 8 Elite चिपसेट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5165mAh बॅटरी देखील असेल.
हँडसेटप्रमाणे या फोनची बॅटरी येते बदलता, अपडेट्स देखील 8 वर्षांसाठी उपलब्ध