Amazon ने तुमच्यासाठी एक उत्तम डील आणली आहे. तुम्ही Motorola चा Edge 50 Pro सध्या सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. फोनवर बँक आणि फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध आहेत. डिव्हाइसमध्ये pOLED डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, डिव्हाइसच्या मागील बाजूस व्हेगन लेदर आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. मोटोरोलाने हा फोन 12GB रॅम व्हेरिएंटसह 35,999 रुपयांमध्ये लाँच केला होता पण सध्या हा फोन खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया या डीलबद्दल…
आनंदाची बातमी! आता तुम्हाला घरपोच मिळेल नवीन SIM Card ; काय आहे प्रोसेस…..
Motorola Edge 50 Pro वर डिस्काउंट ऑफर
Motorola Edge 50 Pro सध्या अमेझॉनवर फक्त 29,999 रुपयांना कोणत्याही बँकेच्या डिस्काउंटशिवाय उपलब्ध आहे, जे त्याच्या सुरुवातीच्या लाँच किमतीपेक्षा खूपच कमी आहे. HDFC Bank Credit कार्ड, Axis Bank Credit Card EMIआणि नॉन-EMI पर्यायांसह तुम्ही फोनवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. याशिवाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हा फोन 1,886 रुपये प्रति महिना सोप्या EMI वर खरेदी करण्याचा पर्याय देखील देत आहे.
याशिवाय, नो-कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर, तुम्ही या डिव्हाइसवर एक्सचेंज ऑफर देखील घेऊ शकता जिथून तुम्हाला 27,650 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते, परंतु ही व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते. म्हणजेच, तुमचा फोन किती जुना आहे किंवा डिव्हाइस खराब झाले आहे.
Motorola Edge 50 Proचे स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, डिव्हाइसमध्ये 6.7-इंचाचा 1.5K pOLED डिस्प्ले आहे. या डिव्हाइसमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 निट्स पीक ब्राइटनेस देखील आहे. डिव्हाइसमध्ये १२GB पर्यंत रॅम आणि २५६GB स्टोरेजसह एक शक्तिशाली स्नॅपड्रॅगन ७ जनरल ३ चिपसेट आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आणि 125W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 13 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10 MP टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या डिव्हाइसमध्ये 50 मेगापिक्सेलचा उत्तम फ्रंट कॅमेरा आहे.
POCO F7 : आतापर्यंतचा सर्वात मोठी बॅटरी असलेला 5G स्मार्टफोन, काय आहे किंमत आणि फिचर्स?